Canacona Dainik Gomantak
गोवा

Canacona News : पैंगीण खाजन जमिनीत बेकायदा मातीचा भराव

Canacona News : मामलेदारांनी त्वरित पाहणी करून रोखले काम

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :

काणकोण, पैंगीण पंचायत क्षेत्रात मागदाळ-गालजीबाग येथे एका जमीनमालकाने खाजन जमिनीत मातीचा भराव घालून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्याची गंभीर दखल काणकोणचे मामलेदार जितेंद्र बुगडे यांनी घेऊन हे काम बंद पाडले.

मामलेदार बुगडे यांनी तक्रारीनंतर प्रत्यक्ष कामाची पाहणी केली आणि बांधकाम साहित्य जप्त केले. हे बांधकाम करताना काही खारफुटी झाडांची कत्तल केल्याचे मामलेदारांना आढळून आले.

या बेकायदेशीर कामाचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांना पाठविणार असल्याचे मामलेदार बुगडे यांनी सांगितले.

पैंगीणच्या तलाठ्यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मला कळविले होते. त्यावेळी त्यांनी संबंधितांना हे बांधकाम बंद करण्याचा आदेश दिला होता.

तरीही त्याने ते बंद केले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून ते बेकायदा काम बंद पाडले. पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना अहवाल पाठवणार असल्याचे बुगडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

UPI Payment Charges: UPI आता 'मोफत' राहणार नाही? 2 हजारांवरील व्यवहारांवर 0.4 टक्के MDR; झटपट पेमेंटची किंमत ग्राहकांनाही मोजावी लागणार?

''लादेन कुठं लपला होता माहितचं असेल...'', भारतानं पुन्हा फाडला पाकड्यांचा बुरखा; दहशतवाद्यांच्या आश्रयदात्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT