Canacona Mega Housing Project Dainik Gomantak
गोवा

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

Dele Villagers Protest: काणकोण तालुक्यातील देळे येथे प्रस्तावित मेगा गृहनिर्माण प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत

दैनिक गोमन्तक डिजिटल

चावडी: काणकोण तालुक्यातील देळे येथे प्रस्तावित मेगा गृहनिर्माण प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत, कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प गावात होऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

प्रकल्पाविरोधातील भूमिका संबंधित शासकीय विभागांना कळविण्यात आल्याचे सांगून, पुढील पंधरा दिवसांत प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा गावकर यांनी दिला. या पत्रकार परिषदेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावकर म्हणाले, प्रकल्पासाठी नियोजित रस्ता केवळ अडीच मीटर रुंद असून दोन वाहने एकाच वेळी जाऊ शकत नाहीत. सुमारे १५० घरांचे देळे गाव हिरव्यागार डोंगररांगा आणि निसर्गसंपन्न परिसराने वेढलेले आहे. अशा ठिकाणी मेगा प्रकल्प उभारल्यास पर्यावरणासह गावाच्या सामाजिक समतोलावर विपरित परिणाम होऊ शकतो. मूलभूत सुविधांचा अभाव असताना मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी देणे योग्य नाही.

ग्रामस्थांचा विरोध का?

अडीच मीटर रुंद रस्ता; वाहतुकीवर ताण. पर्यावरण, निसर्गसौंदर्य धोक्यात येण्याची भीती. वीज, पाणी व मूलभूत सुविधांचा अभाव.

१५० सदनिकांमुळे वाढणारी लोकसंख्या. संस्कृती व परंपरांवर परिणाम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT