ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: 12 टक्क्यांसाठी 88 टक्क्यांवर अन्याय नको, काणकोणात बहुजन समाजाची बैठक; रोटेशन पद्धतीने आरक्षण मान्य

Canacona ST Reservation Opposition: काणकोण मतदारसंघ एसटींसाठी राखीव करू नये, १२ टक्क्यांसाठी ८८ टक्के नागरिकांवर अन्याय होता कामा नये.

दैनिक गोमन्तक डिजिटल

काणकोण : काणकोण मतदारसंघ एसटींसाठी राखीव करू नये, १२ टक्क्यांसाठी ८८ टक्के नागरिकांवर अन्याय होता कामा नये, बहुजन समाजावर अन्याय झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि जातीनिहाय जनगणना झाल्यानंतरच रोटेशन पद्धतीने आरक्षण मान्य करू, असा ठराव काणकोण येथे बहुजन समाजाच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

रविवारी येथील जीएम सभागृहात ‘पिपल्स फ्रंट’तर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला श्री मल्लिकार्जुन देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, कोमरपंत समाजाचे उपाध्यक्ष सुनय कोमरपंत, पागी समाजाचे उपाध्यक्ष शैलेश पागी, धनगर समाजाचे झोरे, सारस्वत समाजाचे अध्यक्ष विपुल भट, भंडारी समाजाचे अध्यक्ष प्रवीर भंडारी, नरेंद्र काणकोणकर

रुद्रेश नमशिकर, शैला प्रभू देसाई, गीता परब, रॅमी डायस, कुकळ्ळी चिफ्टन ट्रस्टचे ऑस्कर मार्टिन, दैवज्ञ समाजाचे श्री वेर्णेकर, ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष चेतन देसाई, माजी आमदार विजय पै, गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते विकास भगत, संताजी नाईक गावकर, विपिन प्रभुगावकर, नंदीप भगत, पंकज नाईक गावकर, सम्राट भगत, किरण नाईक गावकर, दिप्तेश देसाई, राजमोहन शेट्ये, माजी नगराध्यक्ष महादेव देसाई, रंगनाथ नाईक गावकर, रत्नाकर धुरी आदी उपस्थित होते.

केंद्रीय अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष सुहास फळदेसाई म्हणाले की, राज्यात तीन जिल्हे असून तिन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना समान प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना आणि परिसीमन करा, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. वेळ आल्यास अन्य समाजांच्या सहकार्याने आम्हीही कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहोत.

लढाई लढण्यास आम्ही तयार

पागी समाजाचे उपाध्यक्ष शैलेश पागी म्हणाले की, गेली अनेक वर्षे आपण एसटी समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. एसटी आरक्षण लादल्यास त्याविरोधातील लढाई लढण्यास आम्ही तयार आहोत. दुसरीकडे, राष्ट्रीय ओबीसी संघाचे सदस्य पंकज नमशिकर यांनी सांगितले की, क्षत्रिय मराठा समाजाने गोवा मुक्तीसाठी बहुमूल्य योगदान दिले असून काणकोणच्या ९९ स्वातंत्र्यसैनिकांपैकी ६० स्वातंत्र्यसैनिक क्षत्रिय मराठा समाजातील होते. वेळ आल्यास गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून हा समाज सहकार्य करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT