Agriculture in Goa Dainik Gomantak
गोवा

Cancona: चिंताजनक! काणकोणात शेकडो हेक्टर शेतजमीन पडिक! कुळकायदे, भटक्या गुरांची समस्या

Canacona Agriculture: लोलये पंचायत क्षेत्रातील लोलये ते माशेपर्यंतची जमीन गेली वीस वर्षे पडिक आहे. त्याला वेगवेगळी कारणे आहेत.

Sameer Panditrao

काणकोण: काणकोणात प्रत्यक्षात वायंगण लागवडीखालील क्षेत्र फक्त ४९ हेक्टर आहे. खरीप भात पिकाखालील जमीन २५२० हेक्टर आहे. तरीही काही भागात शेकडो हेक्टर जमीन पडिक आहे.

लोलये पंचायत क्षेत्रातील लोलये ते माशेपर्यंतची जमीन गेली वीस वर्षे पडिक आहे. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. त्यामध्ये बहुतांश जमीन कूळ कायद्याखाली कुळांची आहे. त्याशिवाय येथे भटक्या गुरांचा उपद्रव सुरू असतो.

सध्या काणकोणात चिपळे, देवाबाग, वेलवाडा, खरेगाळ या व एक-दोन भागात वायंगण शेती केली जाते. पाळोळे फार्मस क्लबची स्थापना करण्यात आली आहे. त्या क्लबतर्फे पडिक असलेली सुमारे ७ हेक्टर जमीन लागवडीखाली आणण्यात आली आहे, अशी माहिती साहाय्यक कृषी संचालक नागेश कोमरपंत यांनी दिली.

काणकोणात काजू लागवडीखालील क्षेत्र ३५०० हेक्टर, नारळ १५० हेक्टर, ऊस ६० हेक्टर, केळी १५० हेक्टर, आंबा ५०० हेक्टर, सुपारी ५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. काणकोणात ३७६३ पेक्षा जास्त किसान कार्ड शेतकरी व १६०० शेतकरी प्रधानमंंत्री किसान कार्डधारक आहेत, असे साहाय्यक कृषी संचालक नागेश कोमरपंत यांनी सांगितले.

भाजी पिकाखालील क्षेत्र अधिक

खरीप हंगामात २५० हेक्टर व रब्बी हंगामात ३५० हेक्टर जमीन वेगवेगळ्या भाजी पिकाखाली आहे. यंदा प्रायोगिक तत्त्वावर बारा शेतकऱ्यांना एकूण एक हेक्टर क्षेत्रात हायब्रीड जातीच्या टॉमेटोची लागवड करण्यासाठी बियाणी दिली आहेत. या रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या १० ग्रॅम टॉमेटो बियाण्याची किंमत एक हजार चारशे रूपये आहे. हे शेतकरी बहुतांश गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्रातील आहेत.

त्याशिवाय शैक्षणिक संस्थांना परसबाग करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची कृषी अवजारे व सेंद्रिय खते देण्याची योजना चालीस लावण्यात आली होती. त्याशिवाय शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर चिटकी, वालपापडी, अळसांदे, भेंडी, कोबी, मुळा, फ्लॉवर, काकडी, वांगी यांची बियाणी देण्यात येतात, अशी माहिती साहाय्यक कृषी संचालक नागेश कोमरपंत व साहाय्यक विभागीय कृषी अधिकारी सर्वानंद सर्वणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT