Goa Drug Case Dainik gomantak
गोवा

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

Goa Drug Case: गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ गांजा बाळगल्याप्रकरणी फोंड्यातील एकाला अटक केलीय.

Pramod Yadav

Goa Drug Case

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बाणस्तारी बाजारात धडक कारवाई करताना, तरणाच्या पिशवीत गांजा हा अमली पदार्थ आढळून आला.

पोलिसांनी तिस्क- उसगाव फोंडा येथील तरुणाला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून दोन लाख किंमतीचा 1.650 किलो गांजा जप्त केला आहे.

केशव उर्फ साईराज नागेश शेट वेरेकर (24, रा. तिस्क- उसगाव फोंडा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक नितीन हर्ळणकर यांनी पथकाच्या मदतीने मंगळवारी (दि.३०) बाणस्तारी बाजारात धडक कारवाई केली. यात त्यांना केशव वेरेकर यांच्याकडे असलेल्या पॉलिथीनच्या पिशवीत दोन लाख किंमतीचा 1.650 किलो गांजा आढळून आला.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातील अमली पदार्थ (गांजा) यासह त्याच्या जवळील स्मार्टफोन देखील जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी केशव वेरेकर याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT