Mickky Pacheco
Mickky Pacheco Dainik Gomantak
गोवा

Mickky Pacheco: नुवेंत मिकी ‘बाजी’ मारू शकतील?

दैनिक गोमन्तक

Mickky Pacheco (मिलिंद म्हाडगुत): नुवे हा पूर्वीचा लोटली मतदारसंघ. 2012 साली या मतदारसंघातून माजी मंत्री मिकी पाशेको हे निवडून आले होते. ते या मतदारसंघाचे पहिले आमदार. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे प्रस्थापित नेते तथा माजी वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा पराभव केला होता.पण आता या पक्षातून त्या पक्षात येजा करणाऱ्या पाशेकाेंना (Mickky Pacheco) बाजी मारता येईल का, असा प्रश्‍न मतदारांतून विचारला जात आहे. (Mickky Pacheco Latest News Updates)

मात्र, 2017 साली त्यांना त्यांचेच निकटवर्तीय विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान यांच्याकडून 5500 हून अधिक मतांनी मात खावी लागली होती. आता ते पुन्हा नुवेत दाखल झाले आहेत. वास्तविक ते बाणावलीतील कॉंग्रेस उमेदवारीकरिता इच्छुक होते. त्यादृष्टीने त्यांनी बाणावलीत 4800 सदस्यांची नोंद सुध्दा केली होती. पण ऐनवेळी कॉंग्रेसने (Congress) तियात्रिस्त टोनी डायस यांना उमेदवारी देऊन मिकींचा पत्ता कट केला होता. नाराज झालेल्या मिकींनी कॉंग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी ते राष्ट्रवादीतर्फे बाणावलीतून निवडणूक (Goa Elections 2022) लढविणार असे वाटत होते. पण निर्णायक क्षणी त्यांनी नुवेत जाण्याचा निर्णय घेतला. आता ते परत बाबाशानच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे पात्रे तीच असली तरी भूमिका बदलल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल, आप हे पक्ष एकाच रस्त्यावरचे सगळे मुसाफिर असले तरीही त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता नाही.मात्र,ते एकामेकांच्या मतपेढीवर आक्रमण करू शकतात. या स्थितीचा फायदा नुवेचे माजी आमदार बाबाशान यांना होतो,का हे बघावे लागेल. सध्या बाबाशान यांच्यासोबत कॉंग्रेसचे कार्यकर्ते दिसताहेत. ते कार्यकर्ते खरेच त्यांच्या यशात योगदान देऊ शकतील, का हे बघावे लागेल. बबाशान यांचा भाजपप्रवेशही अनेकांच्या जिव्हारी लागला असून त्याचा वचपा ते यावेळी काढतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण मिकींच्या नुवेतील प्रवेशामुळे या येथील समीकरणांत झपाट्याने बदल झाला असून मिकींना कोण पाठिंबा देतात अन्‌ ते किती मते जमवतात, हे बघावे लागेल. कॉंग्रेसतर्फे पुन्हा एकदा आलेक्स सिक्वेरा हेच निवडणूक लढविणार असले तरी गेली 10 वर्षे ते राजकीय विजनवासात असल्याने किती प्रभाव पाडू शकतील, हे सांगणे कठीण आहे. एकंदर नुवेतील वातावरण ‘रंगीबेरंगी’ झाले असून तीनही प्रमुख उमेदवार एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करताना दिसताहेत. यातून कोण‘मंझिल’ गाठतो. याचे उत्तर लवकरच मिळणार आहे हे निश्चित.

बाबाशानना भाजप प्रवेश भोवणार का?

बाबाशान हे 2017 साली कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. पण 2019 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आणि आता ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. नुवे हा कॅथलिक बहुल मतदारसंघ असल्यामुळे तिथे भाजपची डाळ शिजणार नाही,हे जाणून बाबाशान यांनी हा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी पूर्वी केलेला भाजप (BJP) प्रवेश मतदारांच्या पचनी न पडल्यास त्याचा मतांवर किती परिणाम होतो,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

SCROLL FOR NEXT