Amit Patkar | Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Opposition on Goa CM: मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठीच प्रमोद सावंत यांच्याकडून कर्नाटकसाठी प्रचार

विरोधकांकडून टीका; भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

Akshay Nirmale

Opposition on Goa CM: कर्नाटकात या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर तेथे सत्ताधारी भाजपकडून संकल्प रॅलींचे आयोजन केले जात आहे. त्यात भाजपचे नेते कर्नाटकसाठी प्रचार करत आहेत.

गेल्या काही दिवसांत म्हादई नदीचे पाणी वळवण्यावरून गोवा आणि कर्नाटकमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. असे असतानाही नुकताच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकात भाजपसाठी प्रचार केला.

एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे कोणत्याही परिस्थितीत म्हादईचे पाणी वळवणारच असे सांगत असताना गोव्याचे मुख्यमंत्री कर्नाटकात जाऊन त्यांच्यासाठी प्रचार करत असल्यावरून गोव्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी म्हादईबाबत नेमकी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा फ्रंटच्यावतीनेही पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कर्नाटकच्या प्रचाराच्या कृतीचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री केवळ स्वतःची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पदासाठी ते अंध झाले आहेत, त्यातून ते कर्नाटकमध्ये प्रचार करत आहेत.

विजय सरदेसाईंची टीका

तर गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका उघड आणि स्पष्ट आहे. कर्नाटकात सत्तेत पक्ष कोणताही असो ते म्हादईचे पाणी वळविण्यावर ठाम आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सांगतात की, त्यांची एकच महत्वाकांक्षी आहे ती म्हणजे कर्नाटकसाठी म्हादईचे पाणी वळवणे. आमचे मुख्यमंत्री अशा मुख्यमंत्र्यांसाठी प्रचार करत आहेत.

काँग्रेसची टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री खुलेपणाने सांगतात की, म्हादईचे पाणी वळवणार आणि आम्ही ते करून दाखवूच. आणि दुसरीकडे आमचे गोव्याचे मुख्यमंत्री त्याच कर्नाटकसाठी भाजपचा प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

SCROLL FOR NEXT