Cameroon national arrested in Goa Dainik Gomantak
गोवा

कॅमरुन नागरिकाला शिवोलीत अटक, एक लाखांचे कोकेन, 6.81 लाखांची रोकड जप्त; लव्ह स्टोरी व्हिलाजवळ कारवाई

Goa Crime News: नामबाँगला अटक केल्यानंतर ज्यूड फरार होता. त्याचा पोलिस तपास घेत होते, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Pramod Yadav

म्हापसा: कोकेन अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ओशेल - शिवोली येथे कॅमरुन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख १० हजार किंमतीचे कोकेन आणि ६.८१ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जुलैमध्ये त्याच्याविरोधात अमली पदार्थप्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यात त्याचा शोध सुरु होता. हणजूण पोलिसांनी एका ऑपरेशनअंतर्गत ही कारवाई केली.

ज्यूड बौसारी (४४) असे अटक संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात १८ जुलै २०२५ रोजी एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केला होता. तो नामबाँग फ्रेड कार्ल (२१) याला अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे उघडकीस आले होते.

नामबाँगला अटक केल्यानंतर ज्यूड फरार होता. त्याचा पोलिस तपास घेत होते, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हणजूण पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक रमेश हरीजण यांना संशयित ज्यूडबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ओशेल येथील लव्ह स्टोरी व्हिलाजवळ शोध मोहीम राबवली. यावेळी ज्यूड निळ्या रंगाच्या दुचाकीवरुन जाताना दिला.

पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे १ लाख १० हजार किंमतीचे कोकेन आणि ६.८१ लाखांची रोकड आढळून आले. पोलिसांनी अमली पदार्थ आणि रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी संशयिताला अटकेत ठेवले असून, पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: गोव्यातील ‘कास’ शेती फुलणार! पिळगावचे शेतकरी 4 वर्षांनंतर सरसावले, वायंगणीसाठी तरव्याची लावणी

Zuarinagar: रस्ता दिसतो मात्र, गटारे अतिक्रमणात गायब! आमदार वाझ यांच्याकडून पाहणी; कारवाईसाठी पाठवणार अहवाल

Goa Opinion: शिरगाव चेंगराचेंगरी, हडफडे, चिंबल आंदोलन; प्रत्येक प्रकरणात सरकार बॅकफूटवर जातेय

Abhishek Sharma: 14 चेंडूत 50 धावा, तरी युवराज सिंग अभिषेक शर्मावर नाराज; म्हणाला, "अजून जमले नाही....."

Legends T20 League Goa: शेन वॉटसन, शिखर धवन, हरभजन सिंग खेळणार गोव्यात! वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० लीग क्रिकेटचा थरार

SCROLL FOR NEXT