Bicholim Police Dainik Gomantak
गोवा

Bicholim Police: ग्राहक बनून आले अन्‌; मोबाईल चोरले

डिचोली पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

साखळी येथील एका दुकानात ग्राहक बनून आलेल्या दोघांनी 70 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून पळ काढला. मिळालेल्या माहितीवरून डिचोली पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. विकी अशोक शेळके आणि अरविंद सुरेश साळुंके या संशयितांकडून मोबाईलसह चोरीसाठी वापरलेली (एमएच-04, इडी-5450) या क्रमांकाची कारही जप्त केली आहे.

साखळीतील क्रीडा साहित्य विक्रीच्या दुकानात गुरुवारी ही चोरी झाली होती. याप्रकरणी दुकानमालक रत्नदीप सावंत यांनी शुक्रवारी डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दोघेही संशयित गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ग्राहक बनून दुकानात आले आणि सीमकार्डसह सॅमसंग कंपनीचे सुमारे 70 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल घेऊन पसार झाले.

पोलिसांनी तक्रार नोंद करून तपास सुरू केला. मिळालेल्या धाग्यादोऱ्यांवरून पोलिसांनी संशयितांना अटक केली. डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि पोलिस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी हवालदार राजेंद्र गावस यांच्यासह कॉन्स्टेबल आशीष नाईक आणि शैलेश फडते यांनी संशयितांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT