Panjim Bus Accident Case | Panjim Bus Accident | Bus Accident in panjim  Dainik Gomantak
गोवा

Panjim Bus Accident Case: कालवी स्कूलबस दुर्घटनेत हँडब्रेक कार्यरत होता की नव्हता, हेच अस्पष्ट!

Panjim: न्यायालयातील उलटतपासणीवेळी आरटीओ अधिकाऱ्यांनी बसची तपासणी करताना ठोस पुरावा सिद्ध करु शकले नाहीत.

दैनिक गोमन्तक

Panjim Accident : तत्कालिन न्यायदंडाधिकारी मिहीर वर्धन यांनी बस चालक राजेश नाईक याची फौजदारी प्रक्रिया संहितेखाली कलम 64(4) नुसार जबानी नोंद करण्यापूर्वी आवश्‍यक असलेली पूर्तता पूर्ण केली नाही. बसला ब्रेक होते, की नव्हते तसेच जर होते, तर ते कार्यरत होते का? याचा ठोस पुरावा आरटीओ अधिकाऱ्यांनी बसची तपासणी करताना न्यायालयातील उलटतपासणीवेळी सिद्ध करू शकले नाहीत.

तपासातील गंभीर त्रुटी आणि काही साक्षीदारांच्या विरोधाभासी विधानांमुळे कारोना जेटीजवळ कालवी नदीत बस जाऊन झालेल्या दुर्घटनेच्या आरोपातून बसचालक निर्दोष सुटला. आरटीओ निरीक्षक मिनेश तार यांनी दिलेल्या साक्षमध्ये बस रस्त्यावर धावण्यास तांत्रिकदृष्ट्या तंदुरुस्त होती.

मेघश्‍याम पिळर्णकर यांनी दुर्घटनाग्रस्त बसची तपासणी केली होती, त्यावेळी बसचे टायर्स गुळगुळीत व कमकुवत झाले होते, बसचे ब्रेक व्यवस्थित होते, मात्र हँडब्रेक कार्यरत नव्हता, अशी साक्ष त्यांनी दिली होती. संशयित राजेश नाईक याने दिलेल्या जबानीत बसला हँडब्रेक नव्हता. त्यामुळे न्यायालयातील या जबानी व साक्षमध्ये असलेल्या विसंगतीमुळे सरकारी वकील संशयिताविरोधात ही दुर्घटना बसचे ब्रेक निकामी झाल्याने घडल्याचे सिद्ध करू शकले नाहीत.

दरम्यान, संपूर्ण सुनावणीदरम्यान बसच्या ब्रेक आणि हँड ब्रेकच्या बिघाडावर लक्ष केंद्रित केले गेले, तर फिर्यादीने असा दावा केला, की बस चालकाने निष्काळजीपणे बस चालवली जी चाचणी दरम्यान सिद्ध झाली नाही. त्यामुळे संशयित राजेश नाईक याने बस बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे चालवली किंवा बस आहे, हे पूर्णपणे माहीत असूनही त्याने बस अत्यंत उतारावर नेली, हे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.

राजेश जॉब यांनी दुर्घटनेच्या केलेल्या चौकशीअंती न्यायालयात दिलेल्या जबानीत बस चालकाने उतरणीवर बस न्युट्रलमध्ये उभी करून ठेवण्यात होती, त्यामुळे हा प्रकार घडला सांगितले, तरी उलटतपसाणीमध्ये त्यांनी बस न्युट्रलमध्ये होती, याबाबतची माहिती बसमधील एकाही प्रवाशाने साक्षमध्ये दिली नाही, त्यामुळे ते ठोस पुरावा असे सांगितले होते.

कालवी-कारोना फेरीबोट धक्क्यावर येणाऱ्या वाहनांना रिव्हर्स घेण्यासाठी पार्किंग क्षेत्रात असलेली जागा कमी आहे. त्यामुळे वाहनांना धक्क्याच्या उतरणीवर काही अंतर पुढे जाऊन त्यानंतर रिव्हर्स घेण्याची पाळी येते, अशी साक्ष फेरीबोटीवरील खलाशी फ्रांसिस झेव्हियर रिबेरो याने दिली. त्यामुळे चालकाने धक्क्याच्या उतरणीवर बस नेल्यास ती पाण्यात जाऊन दुर्घटना होऊ शकते, हे ज्ञात होते, हा मुद्दा न्यायालयाने फेटाळून लावला.

पुराव्याला काहीच अर्थ नाही!

उलटतपासणीवेळी मेघश्‍याम पिळणकर यांनी थ्रेड वेअर इंडिकेटर म्हणजे काय याचा अर्थ माहीत नाही. टायर्सच्या दोन्ही बाजूला सहा इंडिकेटर्स असतात याबाबत माहिती नाही. वाहन रस्त्यावर चालण्यासाठी टायर्सची जाडी किती प्रमाणात असायला हवी, याची माहिती संबंधित टायर्सच्या कंपनीकडून घेतली नाही.

त्यामुळे बसचे पुढील दोन्ही टायर्स गुळगुळीत व कुमकवत झाले होते. या पुराव्याला काहीच अर्थ राहत नाही. त्यावर विश्‍वास ठेवता येत नाही. त्यामुळे मेघश्‍याम पिळणकर यांनी दिलेली माहिती गृहित धरता येत नाही. दुर्घटना बसच्या ब्रेकमुळे झाल्याचेही सिद्ध होऊ शकत नाही, असे न्यायालयाने निवाड्यात स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT