Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist Crime: उत्तर प्रदेशातून आलेल्या पर्यटकांनी कळंगूटमध्ये स्थानिक तरुणीची काढली छेड; ग्रामस्थांनी शिकवला धडा

Goa Calangute Crime: रविवारी रात्री उत्तर प्रदेशातून गोव्यात फिरायला आलेल्या दोन पर्यटकांनी स्थानिक तरुणीची छेड काढली, तरुणीने धाडस दाखवत ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला आणि त्या तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगूट: गोव्यात ऑक्टोबरमध्ये पर्यटनाचा हंगाम सुरू होताच पर्यटकांच्या अरेरावीच्या घटनाही समोर येत आहेत. रविवारी (१३ ऑक्टोबर) रात्री उत्तर प्रदेशातून गोव्यात फिरायला आलेल्या दोन पर्यटकांनी स्थानिक तरुणीची छेड काढली.

"आमच्यासोबत येणार का, किती पैसे घेणार" अशा आक्षेपार्ह शब्दात या पर्यटकांनी तरुणीकडे विचारणा केली. मात्र, तरुणीने धाडस दाखवत ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला आणि त्या तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रेमकुमार पांडे (वय ३०), आणि कृष्ण सिंह (वय २४) अशी या आरोपींची नावे आहेत.

शनिवारी रात्री कळंगूट येथे राहणारी तरुणी मित्रमैत्रिणींसोबत दांडिया खेळून घरी परतत होती. घरापासून काही अंतरावर असताना कारमधून आलेल्या दोन तरुणांनी तिची छेड काढली. त्या तरुणीने आरडाओरडा केल्याने स्थानिकही तिथे पोहोचले. स्थानिकांनी पर्यटकांच्या गाडीला अडवल्याने आरोपींना पळ काढता आला नाही. स्थानिकांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी दोघा पर्यटकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. जाब विचारणाऱ्या स्थानिक तरुणांनाही या पर्यटकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. पर्यटकांच्या अशा कृत्यांमुळे गोवा असुरक्षित होत असल्याचे सांगत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

भारतीय न्यायसंहितेतील 74,75,78, 79 अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT