Dirty water from the sewerage plant overflowed at Calangute, Goa. On Friday, 23 July, 2021  Santosh Govekar / Dainik Gomanatak
गोवा

Calangute: कळंगुटात होणाऱ्या सेवरेज प्लांटचे घाण पाणी घरांघरांत

मंत्री लोबोंसाठी हा प्रकल्प (Sewerage plant) म्हणजे पैसे कमावण्याचे कुरण, माजी सरपंच सिक्वेरांचा आरोप

दैनिक गोमन्तक

कळंगुटात (Calangute) होऊं घातलेला अपुर्णावस्थेतील सेवरेज प्लांट () तसेच सध्याच्या बागा (Baga Calangute) रस्त्याची झालेली दुर्दशा पाहाता स्थानिक आमदार तथा मंत्री असलेल्या मायकल लोबो यांना दुरद्रुष्टीचा नेता (Minister Michel Lobo) म्हणणे हास्यास्पद ठरणार असून संबंधित कंत्राटदाराकडून पैसे उकळण्याचा त्यांचा हा अनोखा डाव असल्याचा गंभीर आरोप कळंगुटचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते (Calangute Social Worker) जोजफ सिक्वेरा यांनी केला आहे. सन 2002 पासून आपण कळंगुटच्या सरपंचपदी असतांना गावातील  निचरा व्यवस्थेची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याच्या हेतूने सरकार दरबारी अनेकवेळा प्रयत्न केला होता. परिणामी 105 कोटी रुपये खर्चाचा येथील सेवरेज  प्रकल्प जायका प्रोजेक्टखाली (Jayaka Project) कळंगुटसाठी मंजूर झाला होता. दरम्यान, कळंगुट मतदारसंघाचे (Calangute Constituency) प्रतिनिधित्व करणार्या मायकल लोबो यांच्या कारकिर्दीत हा प्लांट अद्याप अपुर्णावस्थेत असून स्वतःला कळंगुटचा विकास पुरुष म्हणून घेणाऱ्या अशा आमदाराची आम्हांला कींव येत असल्याचे सिक्वेरा यांनी पुढे सांगितले. दरम्यान, कळंगुटातील गांवरावाड्यात श्रीदेवी शांतादुर्गेच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेल्या जागेत तसेच स्थानिक लोकांना विश्वासात न घेतां पंपीग स्टेशन उभारण्याचा मंत्री लोबो यांचा बेत फसल्याने त्यांना तेथून काढता पाया घ्यावा लागला. मात्र, तेथील पंपीग स्टेशन रद्द करण्याची अधिसूचना अद्याप गुलदस्त्यांत पडून असल्याचे जोजफ सिक्वेरा त्यांनी सांगितले. 

कळंगुट येथील आपल्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत सिक्वेरा बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत पंच सदस्य गाब्रीयल फर्नाडीस तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश वायंगणकर उपस्थित होते. दरम्यान, अपुर्णावस्थेत राहिलेल्या येथील सेवरेजच्या भुमीगत गटारांतील घाण पाणी कळंगुटातील मुख्य रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असल्याची त्यांनी माहिती दिली. दरम्यान, कळंगुट बागा येथील रस्त्यांचे निक्रुष्ट दर्जाचे काम झालेले असल्यानेच सध्या याभागातील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तसेच त्या खड्ड्यात पडून अनेकजण जायबंदी झालेले आहेत, त्यामुळे येथील निक्रुष्ट दर्जाच्या नुकसानीचे पैसे एकतर संबंधित कंत्राटदार अथवा मंत्री मायकल लोबो यांच्याकडून वसूल करून घेण्याची त्यांनी मागणी केली.

कळंगुटचे पोलिस निरीक्षक मंत्री लोबोंचे हस्तक

कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ हे मंत्री मायकल लोबो यांचे हस्तक असल्यागत काम करत आहेत, त्यांच्यामुळेच याभागातील गुंडागर्दी तसेच ड्रग्ज व्यवसाय जोमाने फोफावत चालल्याचा आरोप जोजफ सिक्वेरा यांनी यावेळी केला. निरीक्षक रापोझ यांच्या विरोधात कळंगुटातील विविध क्षेत्रातील लोकांकडून आतापर्यंत आठ ते दहा तक्रारी पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या असून मंत्री लोबोंमुळेच रापोझ यांना अभय मिळत असल्याचे सिक्वेरा यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

TTP Attacks Pakistani Army: पाकिस्तानला मोठा झटका! खैबर पख्तूनख्वामध्ये 'टीटीपी'चा सैन्याच्या ताफ्यावर भीषण हल्ला, 10 जवान ठार VIDEO

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT