Karnataka Tourist Death Case Dainik Gomantak
गोवा

Karnataka Tourist Death Case: चौकशीत नवे ट्विस्ट! अक्षताकडून घातपाताचा बनाव, संदीपच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात; फॉरेन्सिक अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा

Calangute Resort Death Case: कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये उडुपी येथील वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक संदीप यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये उडुपी येथील वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक संदीप यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या अक्षता एम. के. ऊर्फ रूपाश्री हिने चौकशीदरम्यान धक्कादायक दावे केले आहेत.

संदीप यांचा मृत्यू घातपाताने नव्हे, तर चुकून झोपेच्या गोळ्या असलेले मद्यप्राशनामुळे झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिस तिच्या या विधानावर विश्वास ठेवण्यास तयार नसून, हा केवळ हत्येच्या आरोपातून सुटण्यासाठी रचलेला बनाव असल्याचा संशय व्यक्त करत आहेत.

दुसरीकडे, फॉरेन्सिक अहवाल हाती आल्यानंतरच संदीप यांचा मृत्यू अतिप्रमाणात झोपेचे औषध घेतल्याने झाला की त्यामागे इतर काही कारण होते, हे स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. संदीप यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फॉरेन्सिक अहवाल या खून प्रकरणातील महत्त्वाचा दुवा आणि पुरावा ठरणार आहे. हा अहवाल येण्यास काही अवधी लागू शकतो. दरम्यान, ३० जून रोजी कळंगुट येथील रिसॉर्टमध्ये संदीप मृतावस्थेत आढळले होते. तांत्रिक पाळत ठेवून पोलिसांनी ३ जुलै रोजी अक्षताला बेंगळुरूमधून अटक केली. तपासात असेही समोर आले आहे की, जानेवारी २०२६ मध्ये पणजी येथेही अशाच प्रकारची एक घटना घडली होती, ज्यामध्ये एका व्यक्तीला गुंगीचे औषध देऊन त्याचे पैसे, दागिने आणि पाकीट लुटण्यात आले होते. यामागेही अक्षताचाच हात असल्याचा संशय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT