Arrest  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पत्त्यांच्या जुगारावर कळंगुटमध्ये छापा; २.४० लाखांची रोकड जप्त

Goa Crime Branch Poilice: यावेळी २४ जणांना अटक करून या जुगारातील रोख रक्कम व इतर जुगार साहित्यासह ३ लाखांचा ऐवज जप्त केला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात मटका जुगाराबरोबरच आता पत्त्यांचा जुगारही चार भिंतींच्या आत जोरदारपणे सुरू आहे. पोलिसांनी याविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने काल मध्यरात्रीच्या सुमारास नाईकवाडा-कळंगुट येथील मासळी मार्केटजवळ असलेल्या इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकला.

यावेळी २४ जणांना अटक करून या जुगारातील सुमारे २ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम व इतर जुगार साहित्यासह ३ लाखांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर रामानन करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कळंगुट येथील मासळी मार्केटजवळ असलेल्या एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये पत्त्यांचा जुगार खेळण्यासाठी लोक उपस्थित येतात, अशी माहिती गुन्हे शाखेच्या खबऱ्यांकडून मिळाली होती.

त्यामुळे यासंदर्भात खातरजमा करून गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता व उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रामानन यांनी आतून बंद असलेल्या फ्लॅटवर छापा टाकला.

वैयक्तिक हमीवर सुटका

या छाप्यावेळी फ्लॅटमध्ये जुगार खेळणाऱ्यांची गर्दी होती. या सर्वांची पोलिसांनी झडती घेत त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यांना ताब्यात घेऊन रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले. जुगार प्रतिबंधक कायद्याखाली पत्त्यांचा जुगार गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांची वैयक्तिक हमीवर आज सकाळी सुटका करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT