Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: 'गांजा' तस्करीचा प्रयत्न उधळला! आसामच्या तरूणाला सिकेरीतून बेड्या, कळंगुट पोलिसांची मोठी कामगिरी

Sinquerim Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे.

Sameer Amunekar

कळंगुट: गोव्यात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. कळंगुट पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत असलेल्या सिकेरी परिसरातील हेलिपॅड जवळ पोलिसांनी शनिवारी केलेल्या एका अचानक धाडीत अमली पदार्थांची तस्करी करणारा एक आरोपी गळाला लागला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १,१४६.५ ग्रॅम संशयास्पद गांजा जप्त केला असून, या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १ लाख १४ हजार रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे गोव्यातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

आरोपीचे धाडस आणि पोलिसांचा सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गोपाळ गोगोई (वय ३१) असे असून, तो मूळचा आसाममधील रहिवासी आहे. गोपाळ सिकेरी परिसरातील हेलिपॅड जवळ अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी किंवा ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने अत्यंत गुप्तपणे घटनास्थळाची पाहणी केली आणि सापळा रचून गोपाळला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मिळून आले.

गुन्हा दाखल

पोलिसांनी जप्त केलेला गांजा हा उच्च दर्जाचा असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी 'नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस (NDPS) ॲक्ट, १९८५' अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदविला आहे. पोलीस आता हा साठा त्याने कोठून आणला होता आणि तो कोणाला वितरित करणार होता, याचा कसून तपास करत आहेत. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अंमली पदार्थ विरोधी मोहिम

गोव्यातील पर्यटन क्षेत्रात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्यामुळे पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कळंगुट पोलिसांनी मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी धाडी घालून तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा-कर्नाटक सीमेवर मोठी कारवाई! काँक्रीट पंप मशीनमध्ये लपवलेली दारू केली जप्त; गुजरात येथील चालकाला अटक

Weekly Horoscope: सुवर्णसंधी चालून येणार, एप्रिलचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी खासच; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य

पुरुषांपेक्षा महिलांच्या पगारात होतेय जास्त वाढ! PLFS २०२५ च्या सर्व्हेतून बाब उघड; स्त्रीयांचे उत्पन्न एकूण तुलनेत कमी असल्याचाही दावा

VIDEO: फातोर्डा पोलीस स्टेशनच्या जवळच राजरोस जुगार सुरु; धक्कादायक व्हिडीओ समोर

मुंबई गोवा हायवेवर 'डिझेल' मिळेल का? सोशल मीडियावर पडला कमेंटचा पाऊस; पोस्ट टाकणाऱ्याने अनुभव लिहिला की, ' 80% पंपांवर.....'

SCROLL FOR NEXT