Drugs case Dainik Gomantak
गोवा

Calangute News: पाच लाखाच्या अमली पदार्थासह नायजेरियन कळंगुट पोलिसांच्या ताब्यात

मागील 10 दिवसांत कळंगुट पोलिसांची दुसरी कारवाई

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसात नायजेरियन तरुणाला अमली पदार्थ तस्करी प्रकरणात कळंगुट पोलिसांनी पकडलं होतं. याला केवळ 10 दिवस होतात न होतात. तोच आज पुन्हा एकदा नायजेरियन नागरिकाला पोलीसांनी कोकेनसह पकडत कारवाई केली आहे.

(Calangute Police nabs Nigerian with drugs worth Rs 5 lakh)

मिळालेल्या माहितीनुसार फिलीप ओबी या नायजेरियन नागरिकाकडून 50 ग्राम कोकेन पकडलं आहे. ही कारवाई कळंगुट पोलिसांनी केली असून पकडलेल्या कोकेनची अंदाजे किंमत 5 लाख रुपये इतकी आहे. पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मागील 10 दिवसांत ही दुसरी कारवाई असून पुन्हा एकदा अमली पदार्थ पुरवठ्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

आणखी कीती दिवस फक्त मलमपट्टी होणार

कोकेनसारखे अमली पदार्थासह नायजेरियन नागरिकावरील कारवाई ही गोवा पोलीसांकरिता नवी नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून अशा कारवाई होतात. याच्यावर काही दिवस गेले की अशा प्रकरणावरण काही स्पष्टीकरण कोणालाच मिळत नाही. यानंतर आणखी काही दिवसांनी आणखी अशाच प्रकारचे प्रकरण समोर येते, पुन्हा पोलीस कारावाई करतात. पुन्हा हे वातावरण शांत होते.

याला आता स्थानिक नागरिक वैतागले असून नागरिकांना यावर कायमचा उपाय हवा आहे. जो कधी होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामूळे आणखी कीती दिवस फक्त वरवरची मलमपट्टी होणार असा सवाल नागरिक विचारु लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

Indigo Flights: गोव्‍यातून इंडिगोची 6 शहरांची विमानसेवा स्‍थगित! गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता; 'हे' कारण आले समोर

Ponda By Election: फोंड्यात मुख्यमंत्र्यांसह पाटकर मैदानात! भाजपचा डोळा परप्रांतीय मतांवर; स्मार्ट सिटी बनविण्याची ग्वाही

VIDEO: "रस्ता नाही, तर मतदान नाही"! गोव्यातील 'या' गावच्या ग्रामस्थांचा इशारा; निवडणुकांवर बहिष्‍कार टाकण्‍याचा निर्धार

Goa Crime: म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश! 1 कोटी 27 लाखांची फसवणूक उघड; दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT