Crime News  Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime News : 16 वर्षीय युवतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

युवतीच्या वडिलांनी कळंगुट पोलिसांत गुन्हा दाखल केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute Police News : खोब्रावाडा-कळंगुट येथे रविवारी 16 वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे.

16 वर्षीय युवतीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघा संशयितांविरुध्द कळंगुट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार युवतीच्या वडिलांनी सोमवारी दिली. कळंगुट पोलिस पुढील तपास करीत आहेत.

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोब्रावाडा-कळंगुट येथे रविवारी 16 वर्षीय युवतीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या युवतीच्या वडीलांनी आज कळंगुट पोलिसांत युवतीच्या म्रुत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत संशयित कोटरेश भिमाप्पा लमाणी तसेच मंजुळा भिमाप्पा लमाणी (गदग-कर्नाटक) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

याबाबत युवतीच्या वडिलांनी कळंगुट पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीत असे नमुद करण्यात आले आहे की, कोटरेश सोबत असलेले संबंध न तोडल्यास सोशल मिडीयावर फोटो शेअर करीन अशी धमकी दोघाही संशयितांनी रविवारी सकाळी 9.30च्या सुमारास 16 वर्षीय युवतीला दिली होती असे तक्रारीत नमुद करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

SCROLL FOR NEXT