Goa Dance Bar Dainik Gomantak
गोवा

Goa Dance Bar: कळंगुटमधील पंचायतीने बेकायदा व्यवसायांवर थेट कारवाई करत 3 डान्स बार केले बंद

Goa Dance Bar: किनारी भागातील 16 अवैध व्यवसायांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Dance Bar: गोवातील किनारी भागात खुलेआम चालणारे बेकायदा डान्स बार आणि त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांना होणारे त्रास लक्षात घेत कळंगुट पंचायतीने गेल्या आठवड्यात डान्स बारचे सर्वेक्षण केले. शुक्रवारी रात्री तीन बेकायदा डान्स बार बंद झाले. यापुढेही बेकायदा व्यवसायांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी दिला.

आतापर्यंत किनारी भागातील 16 अवैध व्यवसायांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून शुक्रवारी रात्री तीन डान्स बार कारवाईच्या भीतीने बंद झाल्याची माहिती सिक्वेरा यांनी दिली. बेकायदा डान्स बार तसेच इतर अवैध व्यवसायांमुळे कळंगुट-बागा या किनारी भागाची प्रतिमा मलीन झाली होती. येथे येणाऱ्या देशी पर्यटकांची परप्रांतीय दलालांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत होती. तसेच त्यांना मारपीट करण्याच्या प्रकारांत वाढ झाली होती.

हल्लीच कळंगुट किनारी झालेल्या एका मारहाण प्रकरणात परप्रांतीय दलालांनी कळंगुटच्या पंच सदस्याच्या मुलासह अन्य दोघा मित्रांना जबर मारहाण केली होती. या घटनेनंतर कळंगुट पंचायत मंडळाने या भागात सुरू असलेले बेकायदा डान्स बार तसेच अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू केली. या कामात पंचायत मंडळाकडून स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेण्यात येते, अशी माहिती सरपंच सिक्वेरा यांनी दिली.

कळंगुट-बागा किनारी भागाला भेट देणाऱ्या देशी पर्यटकांची काही डान्स बारमध्ये आर्थिक फसवणूक होत असून त्यांना मारहाणही होत असल्याचे कळंगुट पोलिस स्थानकाकडून पंचायत मंडळाला पत्राद्वारे सुचित केले होते. पोलिसही अशा व्यवसायांवर बारीक नजर ठेवून आहेत, असे पोलिस निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी सांगितले.

मायकल लोबो, आमदार, कळंगुट-

किनारी भागातील बेकायदा डान्स बार वा अवैध व्यावसायिकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कळंगुटमधील अवैध व्यवसायांवर यापूर्वीच्या पंचायत मंडळाने कारवाईचा बडगा उगारला होता. विद्यमान मंडळही पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू ठेवणार आहे.

जोसेफ सिक्वेरा सरपंच, कळंगुट-

कळंगुटच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी राजकीय मतभेद दूर करून आम्ही एकजुटीने काम करण्याचे ठरविले आहे. अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करताना कायदा- सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. यापुढेही बेकायदा डान्स बारना टाळे ठोकण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2025: गोव्याला फॉलोऑनचा धोका! 2 शतकांसह सौराष्ट्रचा धावपर्वत, अर्जुन तेंडुलकरसह गोलंदाज हतबल

Yash Kasvankar Double Century: 20 चौकार, 5 षटकार! गोव्याच्या कर्णधाराची तुफानी द्विशतकी खेळी; छत्तीसगडविरुद्ध 219 धावांची आघाडी

Chikhalim Bike Fire: सिग्नलला थांबलेल्या दुचाकीने अचानक घेतला पेट! दाबोळी - चिखली मार्गावर आगीचा थरार; दुचाकीस्वार बचावला

Goa ZP Election: 'सध्या लढा आहे तो भाजप विरुद्ध गोवा असा'! LOP युरींचे मत; काँग्रेस, आरजीपी, फॉरवर्ड निवडणूकीसाठी एकत्र

Rama Kankonkar: काणकोणकर हल्लाप्रकरणी मुख्य सूत्रधार 'जेनिटो'च! ऑनलाइन खिल्लीमुळे सुडाची सुपारी; 8 आरोपींविरुद्ध चार्जशीट

SCROLL FOR NEXT