Garbage Near Titos lane Calangute Baga  
गोवा

Calangute Baga: सुलभ शौचालयाजवळ कचरा; कळंगुट पंचायतीची थेट पर्यटन खात्याला नोटीस

Calangute Beach: टीटोज लेन येथे असणाऱ्या सार्वजनिक सुलभ शौचालयाजवळ कचरा टाकल्याप्रकरणी पंचायतीने बुधवारी पर्यटन खात्याला नोटीस पाठवली.

Pramod Yadav

कळंगुट: टीटोज लेनमध्ये असणाऱ्या सार्वजनिक सुलभ शौचालयाजवळील कचऱ्यावरुन कळंगुट पंचयातीने थेट गोवा पर्यटन खात्याला नोटीस पाठवली आहे. शौचालयाजवळील कचरा लवकरात लवकर हटवा असे, पंचायतीने बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

टीटोज लेन येथे असणाऱ्या सार्वजनिक सुलभ शौचालयाजवळ कचरा टाकल्याप्रकरणी पंचायतीने बुधवारी पर्यटन खात्याला नोटीस पाठवली आहे. सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, परिसरात कचरा टाकल्याप्रकरणी आश्चर्य व्यक्त केले आहे. येथेच कचरा विलगीकरण केले जात असल्याची माहिती उघडकीस आल्याचे सिक्वेरांनी म्हटले आहे.

पर्यटन विभाग सुलभ शौचालयाच्या जवळ कचरा विलगीकरण करत आहे. हा प्रकार धोकादायक असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. याशिवाय पर्यटक आणि स्थानिकांना देखील याचा नाहक त्रास होत आहे, असे पंचातीने पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

कळंगुट - बागा पर्यटकांचे आकर्षण

कळंगुट - बागा समुद्रकिनारा नेहमी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. जवळपास सर्वच पर्यटक या समुद्रकिनाऱ्यांना भेट देत असतात. तर, नाईट लाईफच्या अनुभव घेण्यासाठी टीटोजला हजेरी लावणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. दरम्यान, या भागातच कचरा विलगीकरण होत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT