calangute Dainik Gomantak
गोवा

calangute: कळंगुटमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली अटक

चोऱ्यांचे प्रकार होत असल्याने दहा वेगवेगळी साध्या वेशातील पोलिस पथके किनारपट्टी भागात तैनात करण्यात आलेली आहेत.

दैनिक गोमन्तक

calangute: सध्या राज्यात मोठ्या संख्यने पर्यटक दाखल झाले आहेत. सोबतच चोरटे आणि ड्रग्ज विक्रेतही आल्याचे समोर आले आहे. कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्राच्या दोन टोळ्यांतील 12 जणांना गजाआड करून त्यांच्याकडून अनेक आयफोनसह 41 मोबाईल जप्त केले.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले की, सनबर्न ईडीएमला ड्रग्ज तसेच मोबाईल चोऱ्यांचे प्रकार होत असल्याने दहा वेगवेगळी साध्या वेशातील पोलिस पथके किनारपट्टी भागात तैनात करण्यात आलेली आहेत.

कळंगुट येथे एका चोरट्याला पकडल्यानंतर कळंगुट व वागातोर तसेच बागा येथे वावरत असलेल्या दोन टोळींचा शोध घेण्यात आला. या दोन्ही टोळ्या बागा येथील एका हॉटेलात राहत असल्याचे कळताच त्यांना काल पहाटे गजाआड करण्यात आले. या टोळीकडे एक इनोव्हा गाडीने गोव्यात आले होते ती गाडीही जप्त करण्यात आली आहे.

अटक केलेले सर्वजण गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले असून महाराष्ट्र पोलिसांकडे त्यांची माहिती मागवण्यात आली आहे. या चोरट्यांच्या टोळीमध्ये सुमारे 25 जण असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे, असे वाल्सन यांनी सांगितले.

असा झाला पर्दाफाश

पुणे येथील एका तरुणाचा पँटच्या खिशातील मोबाईल अज्ञाताने खेचून पळ काढला. यासंदर्भात कळंगुट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चौकशी केली करून त्याला कळंगुट परिसरातूनच ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने महाराष्ट्रातील विविध भागातील चोरट्यांच्या दोन टोळ्यात गोव्यात आल्या असून त्यामध्ये 12 जण आहेत. तसेच ते राहत असलेल्या बागा येथील दोन हॉटेलची माहिती त्याने दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Javier Siverio: 'हमखास गोल नोंदविणारा खेळाडू'! स्पॅनिश हावियर FC Goa टीममध्ये; प्रशिक्षक मार्केझनी केले कौतुक

Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्यात काणकोण नकोच! निर्णय लादल्यास रस्त्यावर उतरणार'; स्थानिक आक्रमक

Atal Patrol Ship: खोल समुद्रात स्वदेशी 'अटल' घालणार गस्त! गोवा शिपयार्डतर्फे 6वे द्रुतगती जहाज; आणखी 12 जहाजांचे जलावतरण होणार

Goa Job Scam: 20 लाख घेतात, अमेरिकेत नोकरीचे आश्वासन देतात; गोव्यातील तरुणांची होतेय फसवणूक, आमोणकरांनी मांडली व्यथा

Goa University: ‘चोरीचा अहवाल फुटला कसा?’ विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या बैठकीत 4 तास खल

SCROLL FOR NEXT