Goa Tourism  Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shacks: 'सर्व शॅक्सना 11 नंतर खुलं राहण्याची परवानगी द्या; काहीजणांमुळे सर्वांवर अन्याय नको!' कळंगुटच्या आमदारांची विनवणी

Calangute MLA Michael Lobo: रात्री उशिरापर्यंत शॅक्सना खुलं राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.

Akshata Chhatre

पणजी: रात्री उशिरापर्यंत गोव्यातील किनाऱ्यावरील शॅक्सना खुलं राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील शॅक्समध्ये पर्यटकांसोबत झालेल्या गैरव्यवहारामुळे पर्यटन विभागाकडून शॅक्स रात्री ११ नंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

मात्र आता कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी किनाऱ्यावरील शॅक्सना रात्री उशिरापर्यंत खुलं ठेवण्यात यावं अशी मागणी केली आहे. एक-दोन शॅक्समध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे सगळ्याच शॅक्सवर सामान आदेश लागू करणं हे पर्यटनाच्या दृष्टीने बरोबर नाही. पर्यटक किनाऱ्यावर रात्री उशिरापर्यंत येतात, आणि म्हणून शॅक मालकांना देखील त्यांचा व्यवसाय रात्री उशिरापर्यंत चालवण्याची परवानगी दिली पाहिजे असे लोबो म्हणाले आहेत.

व्यावसायिकांवर अन्याय नाही झाला पाहिजे

११ वाजता सर्व शॅक्स बंद कर्णयच्या आदेशावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खावंटे यांनी पुन्हा एकदा नीट विचार करावा अशी मागणी त्यांनी दोघांसमोर केली असल्याचं देखील लोबो म्हणालेत. गोव्याच्या किनाऱ्यांवर काहीही चुकीचे प्रकार घडले असता पर्यटन विभाग लगेच त्यावर रोखठोक भूमिका घेतं यामुळे इतरांसमोर गोव्याची प्रतिमा डागाळते.

पर्यटक जर का चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर स्थानिक शॅक मालकांनी त्यांच्यासोबाबत सबुरीने वागलं पाहिजे, पर्यटकांसोबत चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे मात्र गोव्यात पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवर अन्याय नाही झाला पाहिजे असे मात्र कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

कायदा सर्वांसाठी समान

यापूर्वी देखील उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी शॅक चालवणाऱ्या काही मालकांनी रात्री ११ वाजल्यानंतरही शॅक सुरु ठेवण्याची मागणी केली होती. रात्री उशिरा पर्यटक समुद्र किनाऱ्यावरील शॅकमध्ये येत असल्याने उशिरापर्यंत शॅक सुरु राहिल्यास व्यवसायाला चालना मिळू शकते, असा दावा काही शॅकमालकांनी केला होता . मात्र, धोरणाचे पालन करुन व्यवसाय करणेही महत्त्वाचे असल्याचे देखील त्यांनी मान्य केले होते.

शॅकमालक कल्याण संघटनेचे सरचिटणीस जॉन लोबो म्हणाले होते की, ज्यांनी १ वाजेपर्यंत मद्यविक्रीचा परवाना घेतला आहे, त्यांना नियमानुसार शॅक चालवण्याची परवानगी मिळायला हवी. मात्र, परवाना नसताना उशिरापर्यंत शॅक चालवणे योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT