Calangute property damage Dainik Gomantak
गोवा

Goa Fire: कळंगुट येथे भीषण आग! सिलिंडरचा स्फोट, आगीत खोली जळून खाक; लाखोंचे नुकसान

Calangute fire accident: अग्निशमन दलाच्या वेळेवरच्या कारवाईमुळे ही आग शेजारच्या खोल्यांमध्ये पसरली नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही

Akshata Chhatre

पर्वरी: रविवारी (२८ सप्टेंबर) कळंगुटमधील तिवाईवाडो येथे एका भाड्याच्या खोलीला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या आगीत सुमारे १ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या वेळेवरच्या कारवाईमुळे ही आग शेजारच्या खोल्यांमध्ये पसरली नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तात्काळ बचावकार्य आणि मोठी हानी टळली

पिळर्ण अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, उपअधिकारी रामा नाईक आणि त्यांच्या गटाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांना ती खोली पूर्णपणे आगीच्या विळख्यात आढळली. त्यांनी त्वरित बचावकार्य सुरू करत खोलीतून दोन एलपीजी सिलिंडर बाहेर काढले. यापैकी एक सिलिंडर रिकामा होता, तर दुसऱ्याचा आगीमुळे स्फोट झाला होता. सिलिंडरचा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याचा धोका होता, मात्र अग्निशमन दलाने तो वेळीच टाळला.

आगीत खोली जळून खाक, जीवितहानी नाही

आगीत संपूर्ण खोली पूर्णपणे जळून खाक झाली आहे, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारच्या खोल्यांमध्ये पसरली नाही, ज्यामुळे संभाव्य मोठी हानी टळली. या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही, ही सर्वात दिलासादायक बाब आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK Live Updates: भारत-पाक थरार सुरू व्हायला अवघी काही मिनिटं बाकी, थोड्याच वेळात टॉस

VIDEO: "गोव्यात ओला-उबरला का अडवता?" कॉमेडियनच्या रोखठोक प्रश्नावर टॅक्सी चालकाचं 'लय भारी' उत्तर! व्हिडिओ होतोय व्हायरल

"आता वेळ आलीय!" गोमंतकीयांच्या दुहेरी नागरिकत्वासाठी विजय सरदेसाईंची दिल्ली दरबारी सर्वात मोठी मागणी; काय म्हणाले?

Goa History: खिलजीने यादवांना पराभूत केले! मोठ्या घोडदळासह कोकणात येऊन गोव्याची राजधानी 'गोपकपट्टणा'चा नाश केला

Shukra Gochar: शुक्राची कृपा अन् सोन्याचे दिवस...! 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाची लाट अन् आर्थिक भरभराट; होळीपूर्वीच पालटणार नशीब

SCROLL FOR NEXT