Michael Lobo on Goa Election  Dainik Gomantak
गोवा

गोव्याची जनता भविष्यासाठी मतदान करणार: मायकल लोबो

कळंगुट येथील काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो यांनी पत्रकारांशी संवाद साधला

दैनिक गोमन्तक

गोवा: विधानसभेच्या निवडणुका आज पार पडणार आसून, राज्यातील 40 जागांसाठी आज मतदान होत आहे. ह्या जागांसाठी 301 उमेदवार उभे असून, राज्यामध्ये आज एकाच टप्प्यात निवडणुक होणार असून, सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. तर संध्याकाळी 6 वाजता गोव्यातील मतदान (Goa Election 2022) संपणार आहे. गोव्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 11.04 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. (Michael Lobo statement on Goa Election Voting Day)

कळंगुट येथील काँग्रेसचे (Goa Congress) उमेदवार मायकल लोबो (Michel Lobo) यांनी पत्रकारांशी संवाद साधला, दरम्यान ते म्हणाले "आज राज्यातील लोक केवळ मतदारसंघासाठी नाही तर, गोव्यासाठी मतदान करणार आहेत. जेव्हा आपण गोव्याबद्दल बोलताना, बेरोजगार असलेल्या मुला-मुलींबद्दल, गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेल्या खाणकामाबद्दल, तसेच पर्यटन उद्योगातील समस्यांबद्दलचे मुद्दे नेहमीच ऐरणीवर असतात. आणि यावरच आपण बोलले पाहिजे, ह्या समस्या लक्षात घेऊनच जनता आज भविष्यासाठी मतदान करणार आहे. असे ते म्हणाले" कळंगुटमध्ये (Calangute) तब्बल 35 मतदान केंद्रे असून, तर यावर्षी एकूण 1722 मतदान केंद्रे (Voting Booth) आहेत. आज दिवसभरात कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन तैनात असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fauja Singh: जगातील सर्वात वयस्कर, 114 वर्षांचे मॅरेथॉनपटू फौजा सिंह यांचे अपघाती निधन! जालंधर-पठाणकोट हायवेवर कारने दिली धडक

India Pakistan Tension: 'भारत- पाकिस्तानमधील अणुयुद्ध मी थांबविले'! ट्रम्प यांचा पुन्हा दावा

Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

NFF Meeting: पाक, श्रीलंकन तुरुंगातील मच्छिमारांना सोडवा! ‘एनएफएफ’ची मागणी; 6 किनारी राज्यांशी चर्चेअंती विविध ठराव

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT