Calangute Case : Goa police

 

Dainik Gomantak 

गोवा

एलसीबी करणार कळंगुट तोडफोड प्रकरणाचा तपास; नवीन पथके स्थापन

व्यापारी शत्रुत्वावरून मंगळवारी रात्री प्रतिष्ठित सौझा लोबो रेस्टॉरंटमधील हँगओव्हर पबवर हल्ला करण्यात आला होता..

दैनिक गोमन्तक

कळंगुट: गोवा सरकारने आज कळंगुट रेस्टॉरंटची तोडफोड (Calangute Case) आणि मारहाणीचे प्रकरण गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपवले. आता पर्यन्त हे प्रकरण कळंगुट पोलीसांकडे होते. व्यापारी शत्रुत्वावरून मंगळवारी रात्री प्रतिष्ठित सौझा लोबो रेस्टॉरंटमधील हँगओव्हर पबवर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती.

काय आहे कळंगूट (Calangute) प्रकरण थोडक्यात आढावा

कळंगुट येथील प्राणघातक हल्ला प्रकरणातील चौघा संशयितांना 12 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी बजावण्यात आली होती.

नाईकवाडा-कळंगुट येथे मंगळवारी रात्री उशिरा सुरक्षा रक्षक स्वप्नील रेडकर (30, रा. तोर्डा-पर्वरी) याच्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याबद्दल पोलिसांनी संशयित टारझन पार्सेकर (नागोवा) सूर्यकांत कांबळी (ताळगाव) इमरान बेपारी (सांताक्रूझ) आणि सूरज शेट्ये (मेरशी) यांना अटक केली होती. हे सर्व संशयित हल्ला करून सिंधुदुर्गात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कळंगुट तसेच पेडणे पोलिसांनी (Police) संयुक्तरित्या कारवाई करून त्यांना जेरबंद केले. कळंगुट पोलिस तसेच नाईकवाडा येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले डिस्को क्लब चालविणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांत मतभेद निर्माण झाल्याने एकमेकांचा वचपा काढण्यासाठीच या भागात सुरक्षा रक्षकाचे काम करणारा स्वप्नील रेडकर याच्यावर संशयितांनी जीवघेणा हल्ला केल्याचे सांगण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT