Calangute-Baga road was in poor condition Dainik Gomantak
गोवा

कळंगुट-बागा रस्‍त्‍याची झाली दुरवस्‍था

वाहनचालक त्रस्त: स्‍थानिक व्‍यावसायिकांना धुळीचा त्रास, अपघातांना निमंत्रण

दैनिक गोमन्तक

पणजी: समुद्रकिनाऱ्यांची राणी मानल्‍या जाणाऱ्या कळंगुट किनाऱ्यावर देशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. येथील रस्‍त्‍यातील खड्ड्यांनी स्‍थानिक नागरिक, व्‍यापारी आणि पर्यटकांकडून संताप व्‍यक्‍त होत आहे. कळंगुट सर्कल ते बागा लेनपर्यंतच्‍या रस्‍त्‍याची अक्षरशः चाळण झाली आहे. याचा येथील दुकानदार, स्‍थानिक लोक आणि पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्‍त्‍याचे हॉटमिक्‍स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. यासंबंधी पंचायतीने सार्वजनिक बांधकाम खात्‍याकडे शिफारस केली आहे. पावसाळ्यापूर्वी त्याचे डांबरीकरण होईल, अशी माहिती कळंगुटचे सरपंच शॉन मार्टिन यांनी दिली. सध्या बागा किनाऱ्यापासून पॅचवर्क करण्याचे काम सुरू असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

कोरोना महामारीमुळे गेले दोन पर्यटन हंगाम वाया गेले. यावर्षी कोरोनातून थोडासा दिलासा मिळाल्‍यामुळे देशी पर्यटकांनी राज्‍यातील किनाऱ्यांवर मोठी गर्दी केल्‍याचे दिसून येत आहे. येथील श्री देव बाबरेश्‍वर मंदिर चौक ते कळंगुट सर्कल आणि कळंगुट सर्कल ते बागा किनाऱ्यापर्यंतच्‍या रस्‍त्‍याची चाळण झाली आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी या रस्‍त्‍याचे रुंदीकरण झाले आहे. रुंदीकरण रखडल्‍यामुळे स्‍थानिक नागरिकांसह येथील व्‍यापारी, व्‍यावसायिक आणि पर्यटकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa POCSO Case: पॉक्सो, बलात्कार प्रकरणातील 10 वर्षांच्या शिक्षेला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाची गोवा सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

Saptakoteshwar Temple: गोव्याच्या अधिदैवताचे मूळ स्थानी पुनर्स्थापन? श्री सप्तकोटेश्वर-कोटीतीर्थाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात

SCROLL FOR NEXT