Goa Congress | Vijay Bhike Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: 'तक्रार करणाऱ्या चोराच्या उलट्या बोंबा' काँग्रेसने साधला मायकल लोबोंवर निशाणा

Goa Congress: गोवा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Congress: कळंगुटमध्ये डान्स बारचा उच्छाद झाला असून त्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या आमदार मायकल लोबो यांचे हे कृत्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका काँग्रेसने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेस पक्षाचे माजी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, एहराज मुल्ला, उत्तर गोवा उपजिल्हाप्रमुख राजन कोरगावकर आदी उपस्थित होते. भिके म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे आपण नाही, तर पक्षाचेच नेते म्हणत आहेत.

माजी मंत्री आणि सध्याचे आमदार तसेच पंचवीस वर्षे सरपंच असलेले नेते मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, पोलिस आमचे काहीच ऐकत नाहीत. यापूर्वी मायकल लोबो यांना आपल्याच मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास नसल्याचे दिसून येते. ते यापूर्वीही बोंब मारत होते आणि आताही मारत आहेत.

कळंगुटमध्ये जो विकास लोबो यांनी केला, तो विकास हा बेकायदेशीर कामांतूनच केला आहे. आता बेकायदेशीर कृत्यांतून लोबो यांना कदाचित कमिशन कमी मिळत असेल किंवा मिळतच नसेल म्हणून सध्या त्यांचे नाटक दिसून येते, असेही भिके म्हणाले.

‘लोबोंच्या आशीर्वादानेच बेकायदेशीर कृत्ये’

वकिलास मारहाण झाल्यानंतर न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावे लागले. दुसऱ्यांच्या न्यायासाठी जे झगडतात, त्यांच्यावर जर अशी वेळ येत असेल, तर सामान्य माणसाने काय करायचे? कळंगुट परिसरात जी बेकायदेशीर कृत्ये घडत आहेत, ती आमदार लोबो यांच्या आशीर्वादामुळेच चालू आहेत.

या कृत्यात जे आहेत, त्यांना पकडावे, सरकार तुमचे आहे आणि यंत्रणाही तुमचीच आहे, या सरकारला विरोधक कोणी नको आहे, काँग्रेसचे माजी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

Goa Nestle Case : नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

Goa Casino Crime : गोवा कॅसिनोचा नाद नडला! जुगार खेळण्यासाठी लुटले 30 लाख; दिल्लीत सोनारासह चौघे जेरबंद

SCROLL FOR NEXT