Traffic Congestion  Dainik Gomantak
गोवा

Panjim Traffic Issue: काकुलो मॉलजवळ वाहतूक कोंडी; मलनिस्सारणच्या चेंबरचे काम गतीने

Panjim Traffic Issue: काकुलो मॉल ते मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाकडे जाणारा मार्ग गुरुवारी वाहतुकीला बंद करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Traffic Congestion :

पणजी, काकुलो मॉलजवळील चौकामध्ये सध्या मलनिस्सारणच्या चेंबरचे (मेनहोल) काम गतीने सुरू आहे. त्यामुळे या चौकात आता वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

मिरामारकडे किंवा पणजीकडे जाण्यासाठी चारचाकी वाहनांना अग्निशामक दलाकडून बालगणेश मंदिरामार्गे, तर मिरामारहून ताळगाव किंवा सांताक्रुझ, मळा, पाटोकडे जाण्यासाठी काकुलो मॉल चौकातून मधुबन सोसायटीकडून मार्गाचा वापर वाहनधारक करतात. परंतु काकुलो मॉल ते मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाकडे जाणारा मार्ग गुरुवारी वाहतुकीला बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे टोंक, मिरामारकडे जाण्यासाठी कांपाल बालगणेश मंदिर आणि तेथून बांदोडकर मार्गावरून जावे लागणार आहे. पणजीला जाण्यासाठीही बालगणेश मंदिरापासून बांदोडकर मार्गाचा वापर करावा लागत आहे.

याशिवाय सांतिनेजमधून दुचाकी किंवा सोसायटीतील चारचाकी वाहनधारक ठेवलेल्या बगलमार्गाचा वापर करून काकुलो मॉल चौकापर्यंत येऊन त्यांना हव्या त्या ठिकाणी जाता येईल.

सर्वांनाच करावी लागते कसरत

भूमिगत मलनिस्सारण वाहिनीच्या चौकातील महत्त्वाच्या चेंबरची उभारणी सुरू झाली आहे. त्यामुळे या चेंबरसाठी खोदकाम केलेल्या खड्ड्याच्या बाजूने वाहनधारकांना वाहतूक करावी लागत आहे.

चारचाकी वाहनधारकांना या ठिकाणी चांगलीच कसरत करावी लागत आहे. याशिवाय स्मार्ट रस्त्याच्या कामासाठी वापरात येणाऱ्या अवजड वाहनांची या मार्गावरून ये-जा सुरू असल्याने त्यांचाही अडथळा वाहतुकीला होतो.

काकुलो मॉलच्या दक्षिणेला असणाऱ्या सरकारी वसाहतीतील नागरिकांना रस्त्याच्या बाजूच्या कच्चा मार्गावरून चालत ये-जा करावी लागत असल्याने अनेकांनी रस्ता बंद झाल्यानंतर आपला असंतोष व्यक्त केला होता.

अवजड वाहने रुतण्याची शक्यता

मेनहोलचे काम करण्यासाठी कामगारांची संख्या वाढविली असली तरी अवकाळी पावसामुळे या कामात अडथळा निर्माण होण्याची भीती आहे. खोदकाम केलेल्या खड्ड्यांच्या बाजूला असलेले मातीचे थर तसेच असल्याने ही माती पावसाच्या पाण्यामुळे वाहून जाण्याची किंवा ती भुसभुशीत होऊन त्यात अवजड वाहने रुतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

NFF Meeting: पाक, श्रीलंकन तुरुंगातील मच्छिमारांना सोडवा! ‘एनएफएफ’ची मागणी; 6 किनारी राज्यांशी चर्चेअंती विविध ठराव

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

Sunburn Dhargalim: धारगळवासीयांचा ‘सनबर्न’ला विरोध, सुनावणीला मात्र गैरहजर; न्यायालयाकडून याचिका निकाली

Goa Politics: ..हा तर लोकशाहीचा खून! विधानसभा रणनीतीच्या बैठकीच्या जागी सभापती तवडकर; विरोधकांचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT