मुरगाव नगरपालिका Dainik Gomantak
गोवा

मुरगाव नगरपालिकेचे नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू

अखेर सरकारच्या एका आदेशाद्वारे मुरगाव पालिका इमारतीतील सर्व कार्यालयांना खाली करण्याचे फर्मान

दैनिक गोमन्तक

गोवा (Goa) राज्य नगर विकास संस्था (सुडा) तर्फे वास्को येथील "अ" दर्जाच्या मुरगाव (Mormugao) नगरपालिकेचे नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र पालिका इमारतीत असलेल्या काही सरकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांमुळे नूतनीकरणाच्या कामाला अडथळा निर्माण होतो. याविषयी राज्य नगर विकास विभागाला सूडाच्या कंत्राटदारामार्फत अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. अखेर सरकारच्या एका आदेशाद्वारे पालिका इमारतीतील सर्व कार्यालयांना खाली करण्याचे फर्मान सोडले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वास्को येथील गोव्यातील "अ" दर्जाची मुरगाव नगरपालिकेचे नूतनीकरणाचे काम गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरू करण्यात आले होते. पण मुरगाव नगरपालिका इमारतीत असलेल्या राज्य महसूल विभागाचे मामलेदार, उपजिल्हाधिकारी कार्यालय, याबरोबर नागरी पुरवठा कार्यालय, मुरगाव टपाल खाते, जनता वाचनालय व इतर कार्यालयामुळे सुडाच्या कंत्राटदाराला इमारतीचे नूतनीकरण कामाला अडथळा निर्माण होत आहे. सदर पालिका इमारतीत मुरगाव तालुक्यातील मामलेदार, उपजिल्हाधिकारी कार्यालय असल्याने येथे दररोज नागरिकांची वर्दळ असते. तसेच नगर पालिकेच्या इमारतीत नागरि पुरवठा कार्यालय असल्याने नागरिकांची येथे सदैव गर्दी असते.

यामुळे सुडाला पालिका इमारतीचे काम पूर्ण करता येत नाही. याविषयी राज्य नगरविकास संस्थेने अनेक वेळा राज्य नगरविकास विभागाला माहिती दिली होती. अखेर पर्वरी येथील सचिवालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुरगाव नगरपालिका इमारतीतील सर्व सरकारी कार्यालय स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुरगाव नगरपालिकेचे पूर्ण प्रशासन सडा येथील सुडाच्या नवीन मार्केटमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार मुरगाव मामलेदार व उपजिल्हाधिकारी कार्यालय वास्को बायणा येथील रवींद्र भवनमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. जोपर्यंत दोन्ही विभाग वास्को शहरात चांगले कार्यालय भाडेपट्टीवर मिळत नाही, तो पर्यंत दोन्ही विभाग रवींद्र भवनातून आपले प्रशासन चालवणारा आहे. नागरी पुरवठा विभागाने आपल्या साठी कार्यालय वास्को येथील तळावलीकर इस्पितळासमोर असलेल्या सांन्ता प्लेजिया इमारतीत भाडेपट्टीवर घेतलेले आहे. कार्यालय स्थलांतर केल्यानंतर नागरी पुरवठा विभाग आपले प्रशासन तेथूनच चालवणार आहे. याच इमारतीत मुरगांव तालुक्याचे अबकारी विभागाचे कार्यालय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT