casino  Google Image
गोवा

Goa Crime: कॅसिनोमध्ये पैसे हरल्याने पुण्यातील व्यावसायिकाची नैराश्यातून आत्महत्या, 2 तरूणींविरोधात गुन्हा

तरूणींनी कॅसिनोमध्ये जुगारात फसवल्याचा चिठ्ठीत आरोप

Akshay Nirmale

Goa Crime: गोव्यातील कॅसिनोमध्ये पैसे हरल्याने निराश झालेल्या पुण्यातील एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नैराश्यातून गळफास घेऊन त्याने जीवन संपवले.

विकास शिवाजी टिंगरे (वय 50) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. तो पुण्यातील धानोरी येथे वास्तव्यास होता. धानोरी जकात नाका येथील दुकानात टिंगरे यांनी 23 मे रोजी गळफासाने आत्महत्या केली होती.

या प्रकरणी विकास टिंगरे यांच्या मुलाने विमानतळ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून दोन तरूणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्पिता दास (वय 35) आणि सुश्मिता दास (वय 33) अशी या संशयित तरूणींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार टिंगरे हे ऑनलाईन जुगार खेळत होते. या तरूणींनी त्यांना गोव्यात जुगार खेळण्यासाठी आग्रह केला. त्यांनी कॅसिनोतील जुगारात पैसे जिंकल्यावर खेळ बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरूणींनी त्यांना खेळ बंद करू दिला नाही.

त्यांना पुन्हा जुगार खेळण्यास प्रवृत्त केले. त्यात टिंगरे सर्व पैसे हरले. त्यानंतर ते पुण्यात परतले आणि 23 मे रोजी त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत दोन तरूणींनी फसवणूक करून कॅसिनोमध्ये जुगारात हरवल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT