Goa Electricity Department Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Department: वीज खात्याकडून पथदिपांचा भार वीज ग्राहकावरच!

वीज खात्याकडून पथदिपांचा भार वीज ग्राहकावर लादला जात आहे. मात्र, वीज खात्याने या संदर्भात कोणतीच पूर्व सूचना न देता वीज बिलात पब्लिक लायटिंग ड्युटी या अंतर्गत वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: वीज खात्याकडून पथदिपांचा भार वीज ग्राहकावर लादला जात आहे. मात्र, वीज खात्याने या संदर्भात कोणतीच पूर्व सूचना न देता वीज बिलात पब्लिक लायटिंग ड्युटी या अंतर्गत वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात येत आहे.

(Goa Electricity Department)

या संदर्भात योग्य प्रकारे जागृती झाली नसल्याने सामान्य वीज ग्राहक वाढीव वीज बिल पाहून बुचकळ्यात पडले आहेत. घरघुती वीज ग्राहकांना प्रति युनिट पाच पैसे व व्यवसायिक वीज ग्राहकांना प्रति युनिट वापरावर आठ पैसे या दराने वसूली करण्यात येत आहे.

या संदर्भात वीज अभियंत्यांशी संपर्क साधला असता या संदर्भाच्या दुरुस्तीला विधानसभेत मान्यता मिळाल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात आली आहे असे सांगण्यात आले. यापूर्वी पथदिप दुरुस्तीचा खर्च पंचायती व नगरपालिकेकडून करण्यात येत होता. पण तो भार वीज खात्याने उचलला आहे, असे सांगण्यात आले.

वीज खात्याच्या या निर्णयाला पैंगीणचे पंच सतीश पैंगीणकर विरोध केला आहे. सामान्य वीज ग्राहकांना दहा ते वीस रुपयांपर्यत वाढीव रक्कम वीज बिलापोटी भरावे लागत आहेत. त्याचा वीज खात्याने पुनर्विचार करण्याची मागणी पैंगीणकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT