Goa Budget 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2023: आता गोव्यात बंपर मासळी उत्पादन; मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केल्या 'या' घोषणा

समुद्र गस्तीसाठी मरीन इन्फोर्समेंट विंग स्थापन करणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Budget 2023 on Fisheries: गोवा हा पर्यटनासोबतच मत्स्य उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या माशांच्या चविष्ट डिशेस जगभर प्रसिद्ध आहेत.

मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून 60. 57 कोटी रुपये मासेमारीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज अधिवेशनात दिली.

गोव्याचा आजचा अधिवेशनाचा तिसरा दिवस असून आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर केला.

मासेमारीच्या क्षेत्राबद्दलच्या योजना त्यांनी अधिवेशनात मांडल्या. समुद्र गस्तीसाठी मरीन इन्फोर्समेंट विंग स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील मुख्यमंत्र्यांनी आज मांडला. मत्योत्पादनासाठी राज्यातील नद्यांमध्ये 10 पिंजऱ्यांची युनिट्स उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

तसेच ओल्ड गोवा येथे एक्वाटिक रेफरल लॅबची स्थापना करण्यात येणार असून सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर बाणावली येथे कोळंबी आणि फिन फिश हॅचरी स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील मुख्यमंत्र्यांनी आज अधिवेशनात मांडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT