Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर वुद्ध महिलेच्या बॅगेत सापडल्या पिस्तुलाच्या बुलेट्स, गुन्हा दाखल

नागवे - वाळपई येथील वृद्ध महिला मुंबईला निघाली होती.

Pramod Yadav

दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ पुन्हा एकदा चर्चेत आले असून, विमानतळावर तपासणीवेळी एका वृद्ध महिलेच्या बॅगमध्ये पिस्तुलाच्या बुलेट्स सापडल्या आहेत. पोलिसांनी वुद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

(Bullets found in aged women bag on Dabolim Airport)

मिळालेल्या माहितीनुसार, नागवे - वाळपई येथील वृद्ध महिला मुंबईला निघाली होती. दरम्यान, दाबोळी विमानतळावर तपासणीवेळी तिच्या बॅगमध्ये पिस्तुलाच्या बुलेट्स सापडल्या आहेत. पोलिसांनी तात्काळ महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मागील दोन दिवसांत दाबोळी विमानतळावर दोन मोठ्या घटना समोर आल्या. पाच कोटी रूपयांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली तर, शनिवारी एका प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन तब्बल 179 जणांचा जीव धोक्यात आला होता.

दाबोळी विमानतळावर तब्बल 5 कोटींचे कोकेन जप्त

एनसीबीच्या गोवा विभागाने तब्बल 5 कोटींचे कोकेन अंमली पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई आज एनसीबीने दाबोळी विमानतळावर केली. याप्रकरणी गोवा आणि दिल्ली येथे दोघांना अटक करण्यात आली आहे. 05 मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे जीवन संपववण्याचे प्रमाण का वाढले आहे? पालकांनो सतर्क व्हा..

ICC Men's T20 World Cup2 026: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! अमेरिकेविरुद्धच्या सामन्यातून 'यॉर्कर किंग' बुमराह बाहेर?

Kavale Fire News: चहासाठी भांडे ठेवले, आग भडकून घर पेटले; कवळेतील दुर्घटनेत मायलेक गंभीर जखमी

39 A अंतर्गत परवानग्यांवर न्यायमूर्ती रिबेलोंनी नोंदवला आक्षेप! नगर नियोजन खात्याला पत्र; 163 अर्जांद्वारे प्रस्ताव झाले सादर

Borim Bridge: जीवितहानी झाली की लक्ष द्यायचे, असा काही शिरस्ता आहे का? बोरी पुलाच्या कामाचे गांभीर्य..

SCROLL FOR NEXT