Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: ‘मिकीज’ रेस्‍टॉरंटवर फिरणार बुलडोझर!

Illegal Construction: दक्षिण गोव्‍यातील लोकप्रिय ‘हॅपनिंग पॉईंट’ म्‍हणून प्रसिद्ध असलेले ‘मिकीज बार ॲण्‍ड रेस्‍टॉरंट’ हे आस्‍थापन पाडण्‍याच्‍या गोवा किनारपट्टी व्‍यवस्‍थापन अधिकारिणीने २०१९मध्‍ये दिलेल्‍या आदेशावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने शिक्‍कामोर्तब केले आहे.

दैनिक गोमन्तक

Illegal Construction: दक्षिण गोव्‍यातील लोकप्रिय ‘हॅपनिंग पॉईंट’ म्‍हणून प्रसिद्ध असलेले ‘मिकीज बार ॲण्‍ड रेस्‍टॉरंट’ हे आस्‍थापन पाडण्‍याच्‍या गोवा किनारपट्टी व्‍यवस्‍थापन अधिकारिणीने २०१९मध्‍ये दिलेल्‍या आदेशावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने शिक्‍कामोर्तब केले आहे.

हॉटेलमालकाने जी चार महिन्‍यांची मुदत मागितली होती, ती देण्‍यात आली आहे. असे जरी असले तरी मूळ आदेशात या आस्‍थापनातील सर्व व्‍यवहार बंद करण्‍याचे निर्देश

दिल्‍यामुळे दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी कार्यालयाने हस्‍तक्षेप करून हे हॉटेल ताबडतोब सील करावे अशी मागणी ही याचिका दाखल करणाऱ्या कोलवा सिव्‍हिक ॲण्‍ड कन्‍झुमर फोरमच्‍या निमंत्रक ज्‍युडिथ आल्‍मेदा यांनी केली आहे.

दरम्‍यान, आल्‍मेदा यांनी सांगितले की, मूळ आदेशात ३० दिवसांत सर्व व्‍यवहार बंद करण्‍यास सांगितल्‍याने सर्वोच्‍च न्‍यायालयाने ही याचिका फेटाळल्‍यानंतर हे हॉटेल बंद करण्‍याची गरज होती. मात्र अजूनही ते सुरू आहे. वास्‍तविक दक्षिण गोवा जिल्‍हा प्रशासनाने सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाची दखल घेत हे हॉटेल ताबडतोब सील करण्‍याची गरज आहे, अन्‍यथा न्‍यायालयाच्‍या आदेशाचा तो अवमान ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT