Goa Fire in Forest Dainik Gomantak
गोवा

Goa Fire in Forest: डोंगराला लागलेल्या आगींमागे बिल्डर लॉबी; आमदार विरेश बोरकर यांचा आरोप

पारपोई मंडूर डोंगराला आग मुद्दाम लावल्याचा रिव्होल्युशनरी गोवन्सचा आरोप

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Fire in Forest: डोंगरांना लागलेल्या आगींच्या मागे बिल्डर लॉबी कार्यरत आहे. त्यांना या जमिनी बळकावयाच्या आहेत, असा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनी केला.

गोव्यातील आजोशी मंडूर पंचायत क्षेत्रातील पारपोई मंडूर इथल्या डोंगराला मुद्दामहून आग लागल्याची घटना दोन दिवसांपुर्वी घडली होती. दोन दिवस ही आग धगधगत होती. रेव्होलुशनरी गोवन्सच्या कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत ह्या आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत होते. परंतु दुसऱ्या दिवशी सुद्धा ही आग धगधगत होती.

सोमवारी रिव्होल्युशनरी गोवन्सचे सांत आंद्रेतील आमदार विरेश बोरकर हे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले होते. डोंगराच्या मोठ्या भागात आग लागल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर तिथे अनेक झाडांची कत्तलदेखील झाली आहे.

या वेळी बोलताना विरेश बोरकर म्हणाले की, सध्या राज्यात अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत आहेत. आग लावण्याचे प्रकार हे मुद्दामहून केले जात असून, बडी बिल्डर लॉबी या प्रकरणात गुंतली आहे. बिल्डर लॉबीची नजर आता गोवेकरांच्या डोंगरावर असून ती कशी बळकावायला मिळते त्याकडे त्यांचे लक्ष आहे, असा आरोपही आमदार विरेश बोरकर यांनी केला आहे.

दरम्यान, आजीच्या कार्यकर्त्यांनी बेकायदा कत्तलीपासून झाडांच्या रक्षणासाठी प्रतिकात्मक आंदोलन केले. त्यांनी झाडांना बँड बांधत वृक्ष संवर्धनाबाबत जागृती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी दीर्घायुष्याचे रहस्य समुद्राच्या तळाशी? व्हेल माशांमधील 'या' प्रथिनामुळे माणूस जगू शकणार 200 वर्षे! संशोधनातून खुलासा

मुंबई इंडियन्समध्ये मोठा फेरबदल? हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात, आता सूर्या नव्हे तर तिलक वर्माकडे संघाची धुरा!

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

SCROLL FOR NEXT