Railway Track Doubling Dainik Gomantak
गोवा

Mayem: 'मयेतील रेल्वेस्थानकाला माझ्यासह जनतेचा पूर्ण पाठिंबा', प्रेमेंद्र शेट यांचा विश्‍‍वास; पर्यटनाला चालना मिळण्याचा केला दावा

Mayem Railway Station: मूलभूत साधनसुविधा उपलब्ध होतानाच मयेत पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्‍‍वास आमदार प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केला.

Sameer Panditrao

डिचोली: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राज्याच्या विकास प्रक्रियेला निश्‍चितच गती देणारा आहे. या अर्थसंकल्पातील योजनांमुळे मये मतदारसंघाच्या विकासाला वेगळी दिशा मिळेल. मूलभूत साधनसुविधा उपलब्ध होतानाच मयेत पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्‍‍वास आमदार प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केला.

मयेत वायंगिणी येथे रेल्वेस्थानक स्थापन करण्याचा प्रस्ताव स्वागतार्ह आहे. हा प्रकल्‍प झाल्यानंतर मयेचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल, असा आशावाद शेट यांनी व्यक्त करून रेल्वेस्थानकाच्या प्रस्तावाला माझ्यासह मयेतील जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे, असे भाजप मंडळाच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्‍पष्‍ट केले.

यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर, भाजप उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर, मंडळ अध्यक्ष संदीप पार्सेकर, प्रवक्ते प्रेमानंद म्‍हांबरे, विश्‍‍वास चोडणकर, कमलाकांत वाडयेकर आणि शिवाजी जल्मी उपस्थित होते.

‘गोमंत सरिता दर्शन’

नार्वे गावातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मांडवी तीरावर ‘गोमंत सरिता दर्शन’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत दहा कोटींच्‍या तरतुदीमुळे नार्वे गावाच्या पर्यटनाला चालना मिळेल. अर्थसंकल्पातील योजनांमुळे वीज, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव विकास साधता येणार आहे, असा विश्‍‍वास आमदार शेट यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT