Arambol And Betki Accident
Arambol And Betki Accident 
गोवा

हरमलमध्ये हिट अँड रन, जखमी भावांची प्रकृती चिंताजनक तर बेतकी येथे दुचाकी अपघातात तरुण जखमी

Pramod Yadav

Arambol And Betki Accident

राज्यातील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शनिवारी (दि.17) हरमल आणि बेतकी येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील हरमलच्या हिट अँड रन प्रकरणातील जखमी चुलत भावांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

हरमल येथे हिट अँड रन प्रकरणात चारचाकीने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरुन प्रवास करणारे चुलत भाऊ गंभीर जखमी झाले.

या अपघातात साहील आणि दीप नाईक हे दोन चुलत भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

अपघाताची दुसरी घटना बेतकी येथून समोर आली आहे. यात भरधाव दुचाकीने खासगी बसला जोराची धडक दिली. बेतकी आरोग्य केंद्राजवळ हा अपघात घडला.

अपघातात दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, दुचाकीवर मागे बसलेली युवतीला किरकोळ जखम झाली आहे. दरम्यान, अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT