'आम्हाला मरणही सोबतच येईल', अन् दुर्दैवाने ते खरं ठरलं! सावर्डेत मृत मित्रांवर अंत्यसंस्कार

श्रीकर आणि तन्वेश हे दोघेही सावर्डे शिगमोत्सव समितीची सदस्य असून दरवर्षी मोठया आनंदाने ते शिगमोत्सवात भाग घ्यायचे
Chandor Goa Accident
Chandor Goa AccidentDainik Gomantak

Chandor Accident

कुठेही गेले तरी ते दोघे बरोबर जायचे, काही करायचे असेल तरी एकत्रच करायचे. कुणी कधी याबद्दल विचारल्यास आम्ही मरणारसुद्धा सोबतच, असे लोकांना मिश्कीलपणे सांगायचे आणि दुर्दैवाने नियतीने त्यांचे हे बोल खरे केले.

शुक्रवारी (दि.16) कोलाय कुडतरी (चांदर) येथे अपघातात मरण पावलेल्या तन्वेश आणि श्रीकर यांच्यावर आज सावर्डे येथील स्मशानभूमीत शोकाकूल अंत्यसंस्कार वातावरणात करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

श्रीकर नाईक हा सावर्डेचे माजी सरपंच तथा समाजसेवक नीळकंठ नाईक यांचा सुपुत्र होता. तोही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्यात भाग घेत होता.

श्रीकर आणि तन्वेश हे दोघेही सावर्डे शिगमोत्सव समितीची सदस्य असून दरवर्षी मोठया आनंदाने ते शिगमोत्सवात भाग घ्यायचे, असे बाबूराय नाईक यांनी सांगितले.

ग्रामस्थांनाही अश्रू अनावर

श्रीकर याने काकोडा आयटीआयमधून इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केला होता. ऐन तारुण्यात दोघांनाही मृत्यूने हिरावून नेल्याने सावर्डेतील लोकांना जबर धक्का बसला. आज दोघांचेही मृतदेह घरी आणले असता त्यांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला, हे दृश्य पाहून लोकांनाही अश्रू अनावर झाले.

एकत्रच साजरा करायचे वाढदिवस

श्रीकर आणि तन्देश हे दोघेही जीवलग मित्र होते. एकाचा वाढदिवस 14 जून, तर एकाचा 15 जून; पण दोघेही वाढदिवस एकाच दिवशी साजरे करायचे, शुक्रवारी कामावरून घरी परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

ही बातमी सावर्डे गावात वणव्यासारखी पसरली आणि सावर्डे व कुडचडे भागावर शोककळा पसरली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com