Broiler Egg Price Hike Dainik Gomantak
गोवा

Egg Prices: ब्रॉयलर अंडी पुन्हा महाग; ८० रुपये डझन; पुरवठा मुबलक; तरीही शंभर अंड्यांमागे शंभर रुपयांनी झाली वाढ

Broiler Egg Price Hike: एकाबाजूला मासळी महाग झाली असतानाच आहारातील महत्त्वाचा घटक असलेली ब्रॉयलर अंडीही आता पुन्हा महाग झाली आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: एकाबाजूला मासळी महाग झाली असतानाच आहारातील महत्त्वाचा घटक असलेली ब्रॉयलर अंडीही आता पुन्हा महाग झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसत आहे. अंड्यांना असलेली मागणी लक्षात घेता, मासेमारी बंदीच्या काळात अर्थात जून महिन्यापासून अंड्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसे संकेत अंडी विक्रेत्यांकडून मिळत आहेत.

महिनाभरापूर्वी ब्रॉयलर अंड्यांच्या दरात मोठी घसरण होत प्रति डझनमागे २० रुपयांनी दर कमी झाला होता. त्यापूर्वी श्रावण महिना व चतुर्थीपर्यंत ब्रॉयलर अंड्यांचा दर वाढला होता. जवळपास चार महिने ब्रॉयलर अंड्यांचा दर ९० रुपये डझन इतका होता. मात्र, गेल्या एप्रिल महिन्यात अंडी स्वस्त होत ७० रुपये डझनपर्यंत दर खाली आला होता. गेल्या श्रावण महिन्यानंतर ब्रॉयलर अंड्यांच्या दरात हळूहळू वाढ होत शंभर अंड्यांमागे ९० रुपयांची दरवाढ झाली होती. गेल्या महिन्यात या दरात काहीशी घसरण झाली होती. आता पुन्हा अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे.

शंभर नगामागे ६०० रुपये

डिचोली बाजारात ब्रॉयलर अंड्यांची मुबलक प्रमाणात आवक होत असली, तरी दर कमी होण्याऐवजी वाढू लागले आहेत. . गेल्या महिन्यात ब्रॉयलर अंड्यांचे दर शंभर नगामागे ५०० रुपये होते. आता हाच दर ६०० रुपये झाला आहे. दुसरीकडे, बाजारात क्वचितच गावठी अंडी उपलब्ध होत असून, ती ३०० रुपये डझन आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT