Goa GI Tag | Brinjal Of Agassaim  Dainik Gomantak
गोवा

Goa GI Tag: आगशीच्या वांग्याला जीआय मानांकन

मानकुराद आंबा, गोवा काजू, सातशिरा भेंडी, बेबिंका ही उत्पादनेही रांगेत

Akshay Nirmale

Goa GI Tag: गोव्याच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून आता आगशी येथील वांग्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही गोव्यातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

यापुर्वी गोव्यातील काजू फेणी, मायंडोळी केळी, हरमलची मिरची, खोलाची मिरची आणि काजू यांनाही जीआय मानांकन मिळाले आहे.

गोवा सरकारने मानकुराद आंबा, गोवा काजू, आगशीचे वांगे, सातशिरा भेंडी आणि गोवन बेबिंका ही मिठाई अशी पाच उत्पादने जीआय मानांकन मिळण्यासाठी सादर केली होती. कोरोना महामारीमुळे या प्रक्रियेला विलंब झाला होता.

त्यानंतर जीआय टॅग मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. आणि आता आगशीच्या वांग्याला जीआय मानांकन मिळाले आहे.

दरम्यान, ओले काजूगर, मानकुराद आंबा, सातशिरा भेंडी, गोवन मिठाई बेबिंका यांनाही जीआय मानांकन मिळावे यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. या उत्पादनांनाही जीआय मानांकन येत्या काळात मिळेल, पण सध्या त्याचे सोपस्कार पूर्ण झालेले नाहीत. प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर या उत्पादनांनाबाबतही घोषणा केली जाईल.

कोर्गुट भात, माडाची फेणी, ताळगावचे वांगे, मांगिलार आंबा या कृषी उत्पादनांनाही जीआय मानांकनाचा प्रस्ताव विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालनालयाकडून सादर केला जाणार आहे.

जीआय निबंधकांनी मान्यता दिल्यानंतर हा अहवालावर हरकती मागवल्या जातात. या काळात कुणी आक्षेप न घेतल्यास संबंधित उत्पादनांना जीआय मानांकन दिल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.

जीआय मानांकन म्हणजे काय?

विशिष्ट भागात एखादे उत्पादन घेतले जात असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला जीआय मानांकन दिले जाते. जीआय म्हणजे जीओग्राफिकल इंडिकेशन. म्हणजे विशिष्ट भौगोलिक ओळख.

हा टॅग मिळालेली गोष्ट अथवा उत्पादन संबंधित ठिकाणची मूळ गोष्ट किंवा उत्पादन असल्याचे मानले जाते.

जीआय मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडित आहे. वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळे विविध ठिकाणी उत्पादित होणारे एकच उत्पादन वेगवेगळ्या गुणवत्तेचे असू शकते. त्यामुळे गुणवत्तेची ओळख कायम ठेवण्यासाठी हे मानांकन महत्त्वाचे ठरते.

जीआय टॅगचे महत्त्व

एखाद्या उत्पादनाला जीआय मानांकन मिळाल्यास त्याचे उगमस्थान निश्चित होते. त्याचा फायदा उत्पादकांना मिळतो. कारण त्या उत्पादनाचे नाव इतर कुणी वापरू शकत नाही. उत्पादकांना संबंधित उत्पादनाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठीही त्याचा लाभ होतो.

जीआय मानांकनामुळे उत्पादकाला अनेक लाभ मिळतात. संबंधित उत्पादनाचे नाव इतरांना वापरता येत ना ही तसेच या उत्पादनाची बनावट निर्मिती आणि विक्रीस आळा बसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT