Bright future of Kokani cinema in depends on audience Dainik Gomantak
गोवा

'कोकणी सिनेमाचे उज्वल भवितव्य प्रेक्षकांच्या हातात'

सिनेनिर्मितीसाठीचे अनुदान लवकरात लवकर देण्याची सरकारकडे मागणी

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोव्यात कोकणी सिनेमांची निर्मिती होते. पण गत 15 वर्षांत जिथे 50 सिनेमा तयार व्हायला पाहिजे होती तिथे 20 च्या आसपासच सिनेमा तयार झाले. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार कोकणी सिनेमा दर्जेदार बनविण्याच्या प्रयत्नांत आहेत. पण गोव्यात कोकणी सिनेमा पाहण्यास लोक उत्सुक नाहीत अशी स्थिती आहे. जर कोकणी सिनेमा टिकवायचा असेल किंवा भवितव्य उज्वल करायचे असेल तर ते सर्वस्वी प्रेक्षकांच्या हातातआहे. असे एकमत मडगावात आयोजित "कोकणी सिनेमा- स्थिती व भविष्य" विषयावरील परिसंवादात एकमत झाले. 

हा परिसंवाद दाल्गादो कोकणी अकादमीने कोकणी सिनेमा दिनानिमित्त आयोजित केला होता. या परिसंवादात जितेंद्र शिकेरकर, राजेश पेडणेकर, सुपराज केरकर, ज्योयविन फर्नांडिस यानी भाग घेतला तर तियात्रिस्ट व सिने कलाकार प्रकाश नाईक याने नियंत्रकाचे काम केले.

या प्रसंगी दाल्गादो कोकणी अकादमीचे अध्यक्ष विन्सी क्वाद्रोस, सचिव विलियम फर्नांडिस व कोकणी सिनेमा प्रेमी उपस्थित होते.

कोकणी सिनेमा लोकप्रिय करण्याची जबाबदारी प्रेक्षकांची. निर्माते चांगला सिनेमा तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य करतात पण अपेक्षेप्रमाणे त्याची परतफेड होत नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढील 15 वर्षांत कोकणी सिनेमा निर्मितीची संख्या आणखी रोडावेल अशी भिती सिनेनिर्माता जितेंद्र शिकेरकर यानी व्यक्त केली.

सिनेमा हा थिएटरमध्ये पाहणे अत्यंत आनंददायी असते. पण गोव्यात कोकणी सिनेमासाठी थिएटर उपलब्ध नसतात असे ज्योयविन यानी सांगितले.

गोव्यात सिनेनिर्मितीसाठी ज्या साधन सुविधांची व तंत्रज्ञानाची गरज आहे त्या गोव्यात उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सुपराज केरकर यानी सांगितले. गोव्यात फिल्मसिटीचीही गरज भासते असे त्याने सांगितले.

कोकणी सिनेनिर्मितीसाठी प्रेक्षकांबरोबरच सरकारनेही प्रोत्साहन देणे व साधन सुविधा उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे असे मत राजेश पेडणेकर यानी व्यक्त केले. सरकारने वर्षाकाठी सिने निर्मिती अनुदानासाठी 2.5 ते 3 कोटी रुपयांची तरतुद करण्यावर भर द्यावा. त्याच प्रमाण गेल्या सात वर्षांपासुन सिने निर्मात्यांचे जे अनुदान थकले आहे ते त्याना त्वरित देण्यास सरकारने प्राधान्य. द्यावे. गोव्याची मनोरंजन सोसायटी वर्षातुन एकदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा शिवाय दुसरे काहीच करीत नाही. ही सोसायटी म्हणजे पांढरा हत्ती असल्याचेही त्याने सांगितले. गोव्यातील रवीन्द्र भवनमधील आवाज व्यवस्था बिघडली आहे. शिवाय प्रॉजेक्टरही नादुरुस्त आहेत. त्यामुळे एखाद्या सिनेमा रवीन्द्र भवनमध्ये दाखवायचा झाला तर निर्मात्याला प्रॉजेक्टर धरुन आवाज यंत्रणेची व्यवस्था करावी लागते ही शोकांतिका आहे असेही पेडणेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT