Under Bridge Dainik Gomantak
गोवा

Kasaravarne News : कासारवर्णे येथील साकव धोकादायक

Kasaravarne News : या साकवाची त्वरित दुरुस्ती करावी, अथवा नवीन साकव उभारावा, अशी मागणी होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kasaravarne News : मोरजी, कासारवर्णे येथील महादेव मंदिर परिसरात मुख्य रस्त्यावर असलेला साकव केव्हाही कोसळू शकतो.

या साकवाखालील काँक्रिट पूर्णपणे गळून गेले असून लोखंड गंजलेले दिसून येते. या साकवाची त्वरित दुरुस्ती करावी, अथवा नवीन साकव उभारावा, अशी मागणी होत आहे.

हा साकव कोसळला तर मंदिर आणि इतर परिसरात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. त्यासाठी सरकारने विनाविलंब या साकवाची दुरुस्ती करावी किंवा या ठिकाणी नवीन साकव उभारावा. स्थानिक पंचायतीने यासंदर्भात ठरावही घेतला आहे.

काँग्रेसचे नेते ॲड. जितेंद्र गावकर, उदय महाले, भास्कर नारुलकर आदींनी नुकतीच या साकवाची पाहणी केली.

यावेळी गावकर यांनी समस्या सोडवण्यास सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. हा साकव कोसळला तर मोठी दुर्घटना घडू शकते. सरकारने तातडीने या ठिकाणी नवीन साकव उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT