गोवा

Goa: पुराच्या तडाख्यामुळे गुळेलीतील पूल गेला वाहून

रगाडा नदीवरील हा पूल ऐशीच्या दशकातील असल्याने जूना झाला होता आणि नवीन पूलाची मागणी लोक कित्येक दिवसांपासून करत आहेत.

दैनिक गोमन्तक

सत्तरी: सत्तरीतील (Satari) वाळपई मतदार संघातील गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील पैकूळ येथील रगाडा नदीवरील मिनी पूल रगाडा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर काल दिनांक 23 रोजी वाहून गेला असून यामुळे पैकूळ गावाचा संपर्क तुटला आहे. (bridge in Guleli was swept away due to flood in Goa)

सदर पूल ऐशीच्या दशकातील असल्याने जूना झाला होता आणि नवीन पूलाची मागणी लोक करत असताना आता हा पूल कोसळल्याने या गावातील नागरीकांसमोर वाहतूकीचा प्रश्न उत्पन्न झाला आहे. या गावात जाण्यासाठी हा पूलच एक मार्ग होता.

बोंडला मार्गे सद्या सोय

गुळेलीहून पैकुळ जाण्यासाठी पूल हा एकच पर्याय होता तो कोसळल्यामुळे आता सुमारे सव्वाशे घरे असलेल्या या गावाला बोंडला मार्गे जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. बोंडलामार्गे रस्ता जरा कच्चा असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्यामुळे यावरू वाहतूक करणे सध्या जिकरीचे बनले आहे . परंतु अन्य कोणता मार्ग वा सोय नसल्याने याचाच वापर करावा लागणार आहे.

या भागाच्या पंच माजी सरपंच अस्मिता मेळेकर यांनी नवीन पुलासाठी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात प्रयत्न केला होता आरोग्य मंत्री तथा या भागाचे प्रतिनिधित्व करणारे विश्वजित राणे यांनी सदर पुल व्हावा यासाठी प्रयत्न केले होते आणि सरकार दरबारी सर्व सोपस्कर पूर्ण झाल्याचे समजते.

मात्र हा कमकुवत झालेला पूल येवढ्या लवकर कोसळेल याची तिळमात्र कल्पना या भागातील नागरीकांना नव्हती. सध्या गुळेली वाळपई जाण्यासाठी बोंडला मार्ग वळसा घालून पैकुळ वासियांना जावे लागले.

आज सकाळपासून अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यात पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या समवेत भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT