Break in petrol-diesel price hike in the Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक; सलग 10 दिवस दिलासा

देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल (Petrol) पोर्ट ब्लेअरमध्ये तर सर्वात महाग महाराष्ट्रात विकले जात आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. आजही दिल्ली-मुंबईसह गोव्यातही पेट्रोल दर झपाट्याने वाढत आहेत. आज गोव्यातील पेट्रोलचा दर प्रतिलीटर ₹ 106.67 Rs/Ltr इतका आहे. तर डिझेलचा दर 97.54 Rs/Ltr इतका आहे. (Fuel prices rise in Goa)

देशातील चारही महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल (Petrol) पोर्ट ब्लेअरमध्ये तर सर्वात महाग महाराष्ट्रात विकले जात आहे.

  • Today Petrol Price

North Goa 106.67 ₹/L0.08

South Goa106.18 ₹/L0.30

  • Yesterday Petrol Price

  1. North Goa: ₹ 106.59

  2. Panjim : ₹ 106.43 Rs/Ltr

  3. South Goa: ₹ 105.88

  • Goa Diesel Price

  1. North Goa 97.54 ₹/L0.07

  2. South Goa 97.07 ₹/L0.29

इंडियन ऑइलच्या म्हणण्यानुसार, पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 91.45 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, गोव्यात आज पेट्रोलचा दर 106.67 रुपये आहे. 22 मार्चपासून तेल कंपन्यांनी सलग 14 वेळा किमतीत वाढ केल्याने पेट्रोल आणि डिझेल (Diesel) 10.20 रुपयांनी महागले आहे. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ होत असल्याने, पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT