Bhagavad Gita Dainik Gomantak
गोवा

माया, मोह सोडून परमेश्‍‍वराला शरण जावे: ब्रह्मचारिणी धारणा चैतन्‍य

ब्रह्मचारिणी धारणा चैतन्‍य: ‘गीता ज्ञान यज्ञा’चा समारोप

दैनिक गोमन्तक

पणजी: हा जीव ‘माया’ने प्रेरित असतो. पण त्याचे अधिष्ठान परमात्माचे तत्व असते. भगवद्‌गीतेच्‍या चौदाव्या श्र्लोकात भगवंत म्हणतात की, मायायुक्त गुणांनी ग्रासलेले हे जीवन केवळ माझ्या शरणागतीने पार होऊ शकते. ‘माया’ हा शब्द आपल्या सर्व दुःखाचे कारण आहे व त्याचा इलाज परमेश्वराची शरणागती हेच आहे, असे मार्गदर्शन ब्रह्मचारिणी धारणा चैतन्‍य यांनी केले.

चिन्‍मय मिशन पणजी केंद्रातर्फे सांतिनेज येथील चिन्‍मय आलोक आश्रमात 7 ते 13 मार्च या कालावधीत ‘गीता ज्ञान यज्ञा’चे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमात शेचटच्‍या दिवशी ब्रह्मचारिणी धारणा चैतन्‍य बोलत होत्‍या.

त्‍या म्‍हणाल्‍या की, शक्तिमान माणसातील शक्ती म्‍हणजे भगवंतच आहे. ज्याची शक्ती आसक्ती व कामना या दुर्गुणांनी वर्जित आहे, जी शक्ती धर्माच्या विरोधात नाही, अशी शक्ती भगवंत आहे.

प्रत्येक सजीव आहार, निद्रा, भय, मैथुन या चार गुणांनी बाधक आहे. ही सजीवाची प्रकृती आहे. पशू-पक्षी प्रकृतीनुसार हे गुण पाळतात. पण मनुष्य हे गुण पाळताना विवेकहिन होतो. नियंत्रण न ठेवता वागतो. त्यावेळी त्याची शक्ती ही धर्माविरुद्ध असते. त्यात ईश्‍‍वराची धारणा राहत नाही. हे जग सत्व, रजत व तमस या तीन गुणांच्या आधारे बनलेले आहे. आपण जर या गुणांच्या आधीन झालो तर परमात्मा तत्वाचा आपणास विसर पडतो. समुद्राच्या पाण्यात लाटा येत असतात. त्याचे मूळ पाणी आहे. लाटा मोठ्या-बारीक होत असतात, पण पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व नसते, असेही धारणा चैतन्‍य म्‍हणाल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मांडवीत मोठा कॅसिनो येणार नाही, विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न; CM प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण

Gold, Silver Price: सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, इराण युद्धाचा परिणाम; सुवर्ण बाजारात अस्थिरतेचे वातावरण

Goa Politics: पणजी, फोंडा निवडणुकीवर भाजपने ठरविली रणनीती! गाभा समितीची बैठक, संघटनात्मक हालचालींना वेग

Rashi Bhavishya: शनि दाखवणार चमत्कार! ग्रहांसोबत करणार युती; 'या' 3 राशींसाठी महत्वाचा काळ

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

SCROLL FOR NEXT