Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दक्षिणेत भाजपसमोर ठाकले महिला-संकट

Goa Politics: कार्यकर्ते, नेते संभ्रमात : जागा गमावण्याची भीती

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

दक्षिण गोव्याच्या लोकसभा उमेदवारीसाठी एखादी नवीन ‘बुद्धिमान आणि तडफदार’ महिला शोधून काढण्याचा नवा प्रयोग सत्ताधारी पक्षाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. ॲड. नरेंद्र सावईकर आणि दामू नाईक हे भाजपच्या यादीतील उमेदवार जिंकून येऊ शकणार नाहीत, या पक्षश्रेष्ठींच्या ‘समजामुळे’ वातावरण ‘गढूळ’ बनल्याचे सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते मान्य करतात.

‘‘भाजपच्या दक्षिण गोव्याच्या यादीतील दोन्ही उमेदवार पक्षश्रेष्ठींनी ते जिंकून येऊ शकणार नाहीत, या गृहितकावर नाकारल्यामुळे लोकांमध्येही तसाच संदेश गेला आहे. त्यामुळे एक सोपी निवडणूक कठीण बनली’’, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सदस्याने ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केली.

पक्षश्रेष्ठींनी दक्षिण गोव्यासाठी एखाद्या बुद्धिमान, सुशिक्षित महिलेची निवड करण्याची सूचना केल्यानंतर ही उमेदवारी महिलेला द्यावी, या विचारापेक्षा भाजपच्या मूळ यादीतील सर्वच उमेदवार जिंकण्यासाठी समर्थ नाहीत, असाच समज पसरला व प्रसार माध्यमांनीही तसाच सूर आळवला.

त्यामुळे या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य - ते जरी या मतदारसंघात बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत - शिवाय येथे त्यांचे काम आहे - संकटात सापडले. या दोघांशी त्यांच्या समर्थकांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली व गेले काही दिवस त्यांना आपल्या कार्यकर्त्यांच्या सरबत्तीला तोंड देताना नाकीनऊ येतेय, अशी माहिती मिळाली. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, नरेंद्र सावईकर यांनी गेली अनेक वर्षे दक्षिण गोव्याशी सतत संपर्क ठेवला.

२००९, २०१४ व २०१९ च्या तीन निवडणुका त्यांनी लढविल्या. ‘‘सावईकर यांनी २००९ ची निवडणूक लढवली, तेव्हा ते नवखे होते. त्यामुळे दोन महिने आधी त्यांची उमेदवारी जाहीर होऊनही ऐनवेळी फ्रान्सिस सार्दिन यांची उमेदवारी कॉंग्रेसने जाहीर केल्यानंतर एक अधिक ‘मान्यताप्राप्त’ चेहरा म्हणून तो लोकांनी स्वीकारला; परंतु त्यानंतर भाजपची दक्षिणेत सेंद्रिय पद्धतीने वाढ झाली.

आता जर महिलेच्या नावाने एकदम अनोळखी चेहरा पक्ष पुढे आणू पाहात असेल, तर २००९ पद्धतीचा प्रश्‍न पक्षापुढे उभा राहील.’’ ही पद्धतच चुकीची आहे, असे मत पक्षाच्या अन्य संघटनात्मक नेत्यांनीही व्यक्त केले.

पक्षश्रेष्ठींचीही अडचण होण्याचे कारण दिगंबर कामत यांनी नाकारलेली उमेदवारी. पक्षश्रेष्ठींनी दक्षिणेत स्वत:चा स्वतंत्र सर्वे करून घेतला होता. तेव्हा दिगंबर कामत हे जिंकून येऊ शकतात, असा निष्कर्ष निघाला. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी कामत यांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले होते; परंतु वयाचे कारण देऊन कामत यांनी तो प्रस्ताव साफ नाकारला. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी स्थानिक पक्षश्रेष्ठींकडून नावे मागितली.

शेवटच्या यादीतील दोन नावे पसंत न पडल्याने पक्षश्रेष्ठींनी महिला उमेदवाराचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये आल्या व भाजपकडे जिंकणारा उमेदवार नाही, असे वातावरण तयार झाले.

‘‘दक्षिणेत विपरित वातावरण तयार झाले आहे, यात तथ्य आहे. त्यामुळे नेतृत्वासमोरील अडचणी वाढल्या आहेत’’, असा कबुलीजबाब एका नेत्याने ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या मते, भाजपच्या यादीतील कोणाचीही नावे आम्ही रद्दबातल केलेली नाहीत. उमेदवारीचा विचार होईल, तेव्हा सर्वांची क्षमता विचारात घेतली जाईल.

बाबूंना अजूनही विश्‍वास

दुसऱ्या बाजूला अंतिम यादीत आपले नाव न आल्याने हिरमुसलेल्या बाबू कवळेकर यांना अजून पक्षश्रेष्ठी आपल्या नावाचा विचार करतील, याचा विश्‍वास आहे. त्यांच्या एका समर्थकाने सांगितले की, ‘‘बाबूंचा उमेदवारीसाठी विचार झाला नाही, ही माहिती मिळताच त्यांना दक्षिण गोव्यातून ठिकठिकाणी पाठिंबा व्यक्त झाला. त्यांच्या नावाने काहीजणांनी देवस्थानांमध्ये प्रार्थना केल्या व ‘सांगून’ही घेतले.’’

नव्याने ओळखीला वेळ कुठे?

भाजप समर्थक महिलांची संख्या कमी आहे, असे नाही. महिला उमेदवाराचा शोध घेतला जातोय, हे कळताच अनेक महिलांनी भाजप नेत्यांशी संपर्क साधला. परंतु या महिलांची निवड झाली तरी त्यांची ‘नव्याने ओळख’ मतदारांना करून देण्यास आता वेळ कुठे आहे, असा प्रश्‍न नेते विचारतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT