accumulating rain water on bridges At sanquelim
accumulating rain water on bridges At sanquelim  Dainik Gomantak
गोवा

Goa News: पाण्यातून काढावी लागते वाट; नागरिकांची कैफियत

दैनिक गोमन्तक

कारापूर येथून साखळी शहराला जोडणाऱ्या दत्तवाडी व विठ्ठलापूर येथील दोन्ही पुलांवर सध्या पावसाचे पाणी साचत असल्याने या मातीमिश्रीत पाण्यातून लोकांना तसेच वाहनांनाही वाट काढावी लागते.

गणेशचतुर्थीनिमित्त लोक सध्या गणेश मूर्ती व देखावे पाहण्यासाठी या पुलावरून ये - जा करीत आहेत, परंतु या पुलांवर साचलेले पाणी चारचाकी व अन्य वाहनांमुळे उसळून दुचाकीस्वारांच्या अंगावर पडत आहे. त्यामुळे या पुलांवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

दत्तवाडी येथील पूल मुख्य रस्त्यावर असल्याने या पुलावरून मोठ्या संख्येने वाहनांची ये - जा चालूच असते. या पुलावर सध्या पडणाऱ्या पावसामुळे बरेच पाणी साचते.

पाणी खाली पडण्यासाठी असलेल्या छीद्रांमध्ये माती भरल्याने पाणी पुलावरून खाली जात नाही. या पुलावरून चालत ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांवर तर हमखास हे पाणी भरधाव वाहनांमुळे उसळते.

विठ्ठलापूर पुलावरही साचते पाणी

विठ्ठलापूर - कारापूर येथून साखळी बाजाराला जोडण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरलेल्या पुलावरही बरेच पाणी साचते. साखळी बाजाराच्या बाजूला या पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचून राहत आसल्याने चालत जाणारे लोक पुलाच्या मध्यभागातून चालत जातात.

त्याचवेळी एखादे वाहन भरधाव वेगाने आल्यास अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच या पाण्यातून जाण्याचे टाळण्यासाठी काही दुचाकीस्वारही रस्त्याच्या मध्यभागातून वाहन हाकतात. त्यांनाही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुलावर अंधार

विठ्ठलापूर - कारापूर पुलावरील पथदीप पेटत नाहीत. या अंधाराचा फायदा घेऊन काही टवाळखोर युवकांचे घोळके या पुलावर रात्रीच्या वेळी बसलेले असते. अंधाराचा फायदा घेऊन मद्यपानही करण्यासाठी युवकांचे गट या पुलावर बसतात.

या पुलावर कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पथदीप दुरूस्त करण्याची गरज आहे, अशी माहिती काजीवाडा - विठ्ठलापूर येथील महेश सावंत यांनी दिली.

गढूळ पाण्यातूनच गणेश विसर्जन मिरवणूक

गोकुळवाडी, देसाईनगर, वसंतनगर, तारानगर व इतर भागातील मोठ्या संख्येने गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणूक वाळवंटी किनारी याच दत्तवाडी पुलावरून जाते. गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक याच पुलावरील गढूळ पाण्यातून भाविकांना काढावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT