Goa Accident Death News Dainik Gomantak
गोवा

Borim Accident: दुर्दैवी घटना! विचित्र अपघातात बोरीतील तरुण ठार; गोव्यातील अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच

Goa Accident Death: मिळालेल्या माहितीनुसार, बोरी पुलाजवळ दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना स्कूटरला समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली.

Sameer Panditrao

बोरी येथे घडलेल्या भीषण अपघातात ३७ वर्षीय मनोज देसाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बोरी पुलाजवळ दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना स्कूटरला समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अपघातात मनोज देसाई यांना डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) येथे उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले; मात्र दुखापती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे बोरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात ओव्हरटेक करताना झालेल्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला असून नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मनोज देसाई यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT