bori Dainik Gomantak
गोवा

Bori News : बोरीत नवदुर्गा देवीचा रथोत्सव साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

Bori News :

बोरी, ‘नवदुर्गा माऊली, कृपेची सावली’ म्हणत ढोल-ताशांच्या गजरात बोरी येथे श्री नवदुर्गा देवीचा रथोत्सव गुरुवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

गुलाबी रंगाच्या गुढ्यांनी सजविलेल्या रथात श्री नवदुर्गा देवीची सुवर्णमूर्ती अधिष्ठीत करून वाजत-गाजत रथाचे तळयेवाडा येथील श्री नारायणदेव मंदिरात आगमन झाले. या ठिकाणी महाजन प्रभू सावकर घराण्यातर्फे श्री नवदुर्गा देवीची पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर सुवासिनींनी श्री नवदुर्गा देवीची खणा-नारळाने ओटी भरली.

दुपारी श्री नारायण देव मंदिरासमोर वाद्यांच्या तालावर रथ नाचवून मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. नंतर पूर्वापार जागी रथ ठेवून पूजा-अर्चा झाल्यावर सुवासिनींनी देवीची ओटी भरली. गावातील रस्त्यांची स्वच्‍छता करून रांगोळी घातली होती.

ठिकठिकाणी तोरणे लावून सुशोभीकरण केले होते. देवस्थान समितीचे अध्यक्ष श्‍याम प्रभुदेसाई, सागर प्रभुदेसाई, दिनेश प्रभू, प्रकाश भट, दिगंबर देवारी, दत्तात्रय देवारी, हर्षद देवारी, कैलास देसाई, विनोद पोकळे,

रमाकांत बोरकर, देविदास नाईक, उत्कर्ष प्रभू बोरकर, अनेक मान्यवरांसह विविध भागातील भाविकांनी रथोत्सवात भाग घेतला होता. रात्री श्री नवदुर्गा देवीची आरती झाल्यावर रथावरील गुढ्या भाविकांना प्रसाद म्हणून वाटल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

SCROLL FOR NEXT