Crime  Dainik Gomantak
गोवा

Crime News : बोरीत अभियंता घरीच करायचा गांजाची लागवड; पोलिसांकडून अटक : ८.५० लाखांचे ड्रग्स जप्त

Crime News : याप्रकरणी बांधकाम अभियंता युवराज बोरकर या ३१ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

पणजी, बोरी - फोंडा येथे गांजाची लागवड केलेल्या ठिकाणी अमली पदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) पथकाने छापा टाकून गांजाची रोपे, गांजा तसेच एमडीएमए मिळून सुमारे ८.५० लाखांचे ड्रग्स जप्त केले.

याप्रकरणी बांधकाम अभियंता युवराज बोरकर या ३१ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.

या कक्षाच्या अधिकाऱ्यांनी संशयित युवराज बोरकर याची चौकशी केली असता, गांजाची लागवड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावरून तो उच्च दर्जाचे बियाणे आयात करत होता, अशी माहिती मिळाली.

२ लाखांचे साहित्य हस्तगत

एएनसी पथकाने केलेल्या कारवाईत संशयिताची दुचाकी, एक मोबाईल फोन, तीन एलईडी ग्रोथ लाईट तसेच व्होल्टेज कन्व्हर्टर जप्त केले. या सर्वांची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे. पोलिस निरीक्षक सजीथ पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रियंका गारोडी पुढील तपास करत आहेत.

झटपट पैसे कमावण्याचा फंडा

बोरी येथे घराच्या तळमजल्यावर त्याने हायड्रोपिनॅक गांजाची लागवड केली होती. या गांजाची विक्री तो उत्तर गोवा किनारी भागात स्वस्त दरामध्ये करत असल्याने त्याला ड्रग्स दलालांकडून मोठी मागणी होती. व्यवसायाने अभियंता असूनही झटपट पैसे मिळविण्याच्या आमिषाने तो ड्रग्स व्यवसायाकडे वळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT