Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: बोर्डे-डिचोलीत ‘होमकुंड’ उत्साहात

भाविकांची गर्दी ः भक्तगणांसह श्रींचे अग्नीदिव्य; कौलोत्सवाने सांगता

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News शेकडो भाविकांच्या साक्षीने आणि भक्तीमय वातावरणात बोर्डे-डिचोली येथील प्रसिद्ध ‘होमकुंड’ उत्सव बुधवारी (ता.8) मध्यरात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री वडेश्वर देवाच्या प्रांगणात हा उत्सव पार पडला. होमकुंड स्थळी आल्यानंतर मध्यरात्री पारंपरिक कार्यक्रमांनुसार श्रीं च्या कलशासहित व्रतस्थ भक्तगणांनी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आदी देवदेवतांचा जयघोष करीत रखरखत्या होमकुंडातून अग्निदिव्य केले.

श्रींचा कळस माथ्यावर घेऊन अवसारी मोडानेही अग्नीदिव्य केले. नंतर कौलोत्सव होवून या उत्सवाची सांगता झाली. होमकुंड उत्सवावेळी अग्नीदिव्य पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या उत्सवानिमित्त दशावतारी नाट्यप्रयोगही सादर करण्यात आला.

भक्तांकडून देवतांचा बहुमान

बुधवारी रात्री श्रीं चा कलश मंदिराबाहेर काढण्यात आल्यानंतर होमकुंड पेटविण्यात आले. नंतर वाजत-गाजत देवीच्या कलशासह व्रतस्थ भक्तगण गावतड येथील पवित्र झरीवर जाऊन त्या ठिकाणी स्नान करून पुन्हा वाजतगाजत होमकुंडस्थळी आले.

माघारी येताना भक्तगणांतर्फे श्री सातेरी, श्री महामाया, श्री रवळनाथ, श्री ब्राह्मण, श्री वडेश्वर आदी देवतांचा बहुमान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

Illegal Construction: बेकायदा बांधकामप्रकरणी म्हापसा पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अवमान नोटीस; 15 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT